वर्धा, 19 एप्रिल: वर्ध्यातून (Wardha) एका व्यक्तीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची बातमी समोर येत आहे. वर्ध्याच्या दत्तपूर टी पॉईंटवर ही घटना घडली आहे. हा हल्ला एका पत्रकारावर (journalist) झाल्याचं समजतंय. वर्धेच्या दत्तपूर टी पॉईंटवर अज्ञातांनी एकावर प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्यात रवीद्र कोटंबकर हे गंभीर जखमी झाले आहेत. कोटंबकर हे वर्ध्याच्या एका वृत्तपत्राचे संपादक आहेत. वर्ध्यावरून सेलूला जातं असताना अज्ञातांनी त्यांची कार अडवून त्यांना मारहाण केली आहे. अज्ञातांनी कोटंबकर यांच्या ड्रायव्हरलाही केली आहे. तसंच दोघांना मारहाण करुन हे अज्ञात एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी गाडीची सुद्धा तोडफोड केली आहे. 10 ते 12 हल्लेखोर असल्याची माहिती समजतेय. श्रीमंत होण्याचं आमिष दाखवणाऱ्या Amway ला झटका, ईडीकडून मोठी कारवाई कोटंबकर यांच्या डोक्याला आणि पायावर जबरदस्त मारहाण केली आहे. त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सेवाग्राम पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून कलम 307 , 143 , 148 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचं पथक सध्या आरोपींच्या शोधासाठी रवाना झालं आहे.