JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Jalgaon : अशीच शिक्षा हवी! चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा

Jalgaon : अशीच शिक्षा हवी! चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा

चाळीसगाव शहरात राहणारी चार वर्षाची चिमुकलीला बिस्किटचा पुडा खायला घेऊन देतो, असे सांगून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला होता. या आरोपी नराधमाला जळगाव जिल्हा कोर्टाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, 16 फेब्रुवारी : चाळीसगाव (Chalisgaon) शहरातील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार (rape) करणाऱ्या सावळाराम भानुदास शिंदे (वय 27) या आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयाने (Jalgaon District Court) मरेपर्यंत जन्मठेप (Life imprisonment) आणि 2 लाख 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला (fined) आहे. विशेष न्यायालयाचे न्या. एस.एन. माने-गाडेकर यांनी हा निकाल दिला. विशेष म्हणजे 17 दिवसांत तपास पूर्ण आणि साठ दिवसांत शिक्षा अशा पद्धतीने चाललेला हा जळगाव जिल्ह्यातला पहिलाच खटला आहे. त्यामुळे या खटल्यात विशेष कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात सत्कारही करण्यात आला. चाळीसगाव शहरात राहणारी चार वर्षाची चिमुकलीला बिस्किटचा पुडा खायला घेऊन देतो, असे सांगून आरोपी सावळाराम शिंदे हा पीडितेला चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळ घेऊन गेला. तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केल्याची घटना 27 नोव्हेंबरला रात्री 9 ते 10 वाजताच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांत पोक्सो कायद्यांतर्गत सावळाराम शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून सावळाराम शिंदे याला चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर भादवी कलम ३६३, ३६६(अ), ३७६ (एबी) व पोस्को कायदा अंतर्गत कलम ४, ५ (एम), ६, ८,९ व १० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्याकडे होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्याकडे सोपविला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी व पिडीत मुलीचे कपडे आणि अंगावरील नमुने तात्काळ प्रयोगशाळेत पाठवून डीएनए अहवाल प्राप्त करुन 17 दिवसात गुन्ह्याचा तपास पूर्ण केला. ( दोन्ही मुलं बेरोजगार अन् त्यात दारूचं व्यसन;संतापलेल्या आईने एका क्षणात ‘संपवलं’ ) विशेष न्यायालया श्रीमती एस.एन.माने-गाडेकर यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करयात आले. त्यानंतर पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे आणि जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांनी हा खटला जलदगीतने चालविण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार अवघ्या 60 दिवसात सुनावणी पूर्ण करुन बुधवारी (16 फेब्रुवारी) खटल्याचा निकाल दिला आहे. न्यायालयाने सावळाराम शिंदे याला दोषी ठरवत विविध कलमान्वये दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेप आणि दोन लाख 75 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच दंडातील पन्नास टक्के रक्कम ही पीडितेला देण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहे. शिवाय मनोधैर्य योजनेतून 3 लाख रुपये आणि शासनाकडून 10 लाख रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके यांनी प्रभावी युक्तिवाद केला. या खटल्यात संशयिताला लवकरात लवकर शिक्षा मिळावी यासाठी यशस्वी कामगिरी करणार्‍या अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, सहाय्यक तपासाधिकारी सपोनि विशाल टकले, पो.ना. राकेश पाटील, राहूल सोनवणे, महिला पोलीस कॉन्स्टेबल विमल सानप, सबा शेख, दिलीप सत्रे यांचा जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांच्याहस्ते गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची उपस्थिती होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या