जयपूर, 11 मार्च: समाजात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. प्रेम आणि प्रेमविवाह या अनुषंगाने अनेक ठिकाणी खुनासारखे गंभीर गुन्हेही सध्या घडताना दिसतात. पोलीस याचा योग्य तपास करून गुन्हेगाराला कोर्टात हजर करतात. जयपूरमधल्या (Jaipur) एका युवकाचा संशयास्पद मृत्यू (Suspicious death) झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. प्रियकर घराशेजारी राहणाऱ्या विवाहित प्रेयसीवर शारीरिक संबंधासाठी (Physical Relation) दबाव आणत होता. प्रेयसीने त्यास नकार देत त्याची गळा आणि तोंड दाबून हत्या (Murder) केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी (Police) गुरुवारी रात्री (10 मार्च) आरोपी महिलेला अटक केली असून, या प्रकरणी तिची चौकशी सुरू आहे. मृत व्यक्तीच्या मोबाईलमध्ये असलेल्या अश्लील व्हिडिओबद्दल चौकशी केली असता, शारीरिक संबंधासाठी दबाव टाकल्याने प्रियकराची हत्या केल्याचं प्रेयसीनं कबूल केलं आहे असं पोलिसांनी सांगितलं. या विषयीचं वृत्त `दैनिक भास्कर`ने दिलं आहे. याबाबत एसएचओ बनवारीलाल मीणा यांनी सांगितलं की, या हत्याप्रकरणी आरोपी महिला विनोद कंवर (Vinod Kanwar) (वय 23, रा. फकिरा नगर बैनाड रोड, करधनी) हिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मृत्यू झालेला सुभाष कुमावत (Subhash Kumawat) (वय 25, रा. गोविंदगड) हा विनोद कंवरच्या घरासमोरील खोलीत राहत होता. सुभाष टॅक्सीचालक होता. 6 मार्च रोजी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या हात आणि गळ्यावर नखानं ओरबाडल्याच्या खुणा होत्या. सुभाषचा भाऊ सुनीलने हत्या केल्याचा आरोप करत विनोदविरुद्ध तक्रार दाखल केली होती. याआधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपी विनोद कंवरला अटक केली. सुरुवातीला युवकाचा संशायस्पद मृत्यू झाल्याचं वाटत असल्यानं पोलिसांनी एफएसएल पथकाला घटनास्थळी तपास करण्यास सांगितलं. शवविच्छेदन अहवालात (Post Mortem) सुभाषची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. सुभाषचा मोबाईल तपासला असता, आरोपी विनोदसोबत असलेले अश्लील व्हिडिओ (Video) समोर आले. याबाबत विनोदकडे चौकशी केली असता तिनं सुभाषची हत्या केल्याचं सांगितलं. पुणे: राष्ट्रपती पदकासाठी हवालदारानं पोलीस दलालाच गंडवलं; कांड वाचून बसेल धक्का विनोदने सुभाषची सकाळी 8-9 वाजेदरम्यान हत्या केली. त्यानंतर ती फॅक्ट्ररीत कामासाठी निघून गेली. दुपारी घरी परतली आणि दीड तासांनी पुन्हा निघून गेली. संध्याकाळी पती घरी आल्यावर त्याने सुभाषला चहा पिण्यासाठी बोलवण्यास विनोदला सांगितलं. परंतु, विनोद तिथं गेल्यावर सुभाष त्याच्या घरात मृतावस्थेत आढळल्याचं तिनं नवऱ्याला सांगितलं. त्यानंतर तिच्या नवऱ्याने घरमालकाला याविषयी माहिती दिली. यानंतर पोलिसांना घटनेविषयी कळवण्यात आले. पोलीस घटनास्थळी आले असता, आपल्याला काहीच माहिती नाही, असं ती सांगत होती. मात्र सुभाषच्या मोबाईलमधल्या व्हिडिओमुळे खुलासा झाला असता, तिनं हत्या केल्याचं कबूल केलं. या प्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता विनोदनं सांगितलं की, गेल्या दोन वर्षांपासून सुभाषचे माझ्याशी शारीरिक संबंध होते. माझ्यासोबत राहण्याविषयी तो सातत्याने बोलत असे. माझे कुटुंबीय आणि पतीला याविषयी समजलं होतं. यामुळे माझे आणि पतीचे वारंवार खटके उडत होते. Breaking News: लष्कराचं हेलिकॉप्टर Crash, पायलटचा शोध सुरू दरम्यानच्या काळात या महिलेनं पतीविरुद्ध हुंडा (Dowry) मागितल्याची तक्रारही पोलिसांत दाखल केली होती. पतीला सुभाषवर संशय आल्याने तो पत्नीला त्याच्या गावी घेऊन गेला होता. मात्र ती हट्टानं पुन्हा जयपूरला परतली. पती घराबाहेर पडल्यानंतर सुभाष विनोदच्या घरी येत असे. मात्र सुभाष आणि विनोद यांच्यामध्येही वाद सुरू झाले होते. सुभाष तिला खूप त्रास देत होता. त्याने तिचे व्हिडिओ शूट केले होते. संबंध ठेवण्यास नकार दिल्यास तो स्वतःला आणि तिला जीवे मारण्याची धमकी देत असे. 6 मार्चला विनोदचा पती कामावर निघून गेला. त्यावेळी सुभाष तिच्या घरी आला. शारीरिक संबंधांच्या विषयावरून या दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. भांडणादरम्यान विनोदने बेडवर झोपलेल्या सुभाषचा गळा आणि तोंड दाबलं. यामुळे सुभाषचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रेयसी विनोद कंवरला अटक करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.