स्पा पार्लरमध्ये सेक्स रॅकेट, पोलिसांचा छापा, तरुण-तरुणी आपत्तीजनक अवस्थेत
इंदूर, 16 सप्टेंबर : तरुण आपल्या देशाचं भविष्य आहेत, असं आपण मानतो. अनेक तरुण खूप मेहनत घेत आहेत, त्यांच्या कर्तृत्वाची दखल जगभरात घेतली जात आहे. प्रत्येक तरुण संघर्ष करुन तो करुन आपल्या क्षेत्रात स्वत:चं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक तरुण त्यासाठी झटतोय. मात्र या तरुणांमध्ये काहीजण अपवाद आहेत. ते चुकीच्या मार्गाला लागले आहेत आणि नको ते कृत्य करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांना वेळीच योग्य मार्गावर आणणं हे पोलिसांपुढील मोठं आव्हान आहे. अर्थात वाईट कृत्य करणाऱ्यांना पोलीस सोडत नाहीत. वाईट कृत्य करणाऱ्यांचा पापाचा घडा नक्कीच भरतोच. तशीच काहीशी घटना मध्य प्रदेशच्या इंदूर शहरात घडली आहे. पोलिसांनी एका स्पा पार्लरमध्ये छापा टाकलाय. तिथे काही तरुण-तरुणी अतिशय आपत्तीजनक अवस्थेत पोलिसांना सापडले. त्यामुळे स्पा पार्लरच्या नावाने चालणाऱ्या देहविक्रीच्या धंद्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल 18 जणांना अटक केलीय. यामध्ये तरुणींचा देखील समावेश आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. इंदूरमध्ये पुन्हा एकदा स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी छापा मारुन 12 मुलं आणि 6 मुलींना अटक केली आहे. यामध्ये स्पा मालकाचा देखील समावेश आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली तेव्हा सर्वजण नशेत होते. पोलिसांनी स्पा सेंटरमधून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थदेखील जप्त केले आहेत. ( मामी अन् भाच्याचं जुळलं सूत, नंतर मामासोबत घडलं भयानक कांड; वाचा सविस्तर ) इंदूरच्या पलासिया पोलीस ठाणे क्षेत्रात हॅलो नावाचं स्पा पार्लर आहे. पण इथे स्पा पार्लरच्या नावाने दुष्कृत्य सुरु होते. स्पा सेंटरमध्ये देहविक्री आणि अंमली पदार्थांचा बेकायदेशीर व्यवसाय सुरु होता. पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून या स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या कुकृत्याची माहिती मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी अचानक स्पा पार्लरमध्ये छापा टाकला. यावेळी तरुण आणि तरुणी आपत्तीजनक परिस्थितीत आढळले. पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये छापा टाकल्यानंतर 12 तरुण आणि 6 तरुणी या आपत्तीजनक परिस्थितीत आढळल्या. पोलिसांनी सर्वांना बेड्या ठोकल्या आणि पोलीस ठाण्यात आणलं. पोलीस सर्वांची सविस्तरपणे चौकशी करत आहेत. पोलिसांनी आरोपींविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. विशेष म्हणजे शहरात अनेक स्पा सेंटर आहेत. त्यापैकी अनेक स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा व्यावसाय सुरु असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी संबंधित स्पा सेंटरवर कारवाई देखील झाली आहे. पण तरीही असे स्पा सेंटर बंद होताना दिसत नाहीयत. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर काही स्पा सेंटरमध्ये लपूनछपून आणि चोरुन देहविक्रीचा बेकायदेशीर व्यवसाय सुरु आहे. पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात दारु आणि हुक्का मिळाला आहे.