JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / बायकोचा सावळा रंग पतीला आवडला नाही, लग्नाच्या नऊ महिन्यांनंतरच धक्कादायक कृत्य

बायकोचा सावळा रंग पतीला आवडला नाही, लग्नाच्या नऊ महिन्यांनंतरच धक्कादायक कृत्य

एखाद्या व्यक्तीचा रंग त्याच्यासाठी घातक ठरू शकतो का? तुमचे उत्तर कदाचित नाही असेल पण अशीच एक घटना बिहारमधून समोर आली आहे. जिथे सावळ्या रंगाने एका नवविवाहित महिलेचा जीव (husband killed wife) घेतला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा, 9 मे : एखाद्या व्यक्तीचा रंग त्याच्यासाठी घातक ठरू शकतो का? तुमचे उत्तर कदाचित नाही असेल पण अशीच एक घटना बिहारमधून समोर आली आहे. जिथे सावळ्या रंगाने एका नवविवाहित महिलेचा जीव (husband killed wife) घेतला आहे. लग्नाच्या मेहंदीचा रंगही उतरला नव्हता तोपर्यंत या नवविवाहितेचा रंगामुळे मृत्यू झाला. ही घटना पाटणा जवळच्या फुलवारी शरीफ परिसरातील आहे. काय आहे नेमके प्रकरण? सुमन कुमार आणि त्याची पत्नी सुरभी कुमारी हे फुलवारी शरीफ येथील राष्ट्रीयगंज येथील नवजीवन हॉस्पिटलमध्ये एकत्र काम करायचे. सावळ्या रंगाची असल्याने लग्न झाल्यापासून पती नेहमी टोमणा मारायचा, पण सुरभी हे सतत सहन करत होती. रविवारी रंगावरून पती-पत्नीमधील वाद इतका वाढला की पतीने सुरभीची हत्या केली. इतकेच नाही तर तिची हत्या केल्यानंतर त्याने तिचा भाऊ चंदन कुमारला फोन करून सुरभीचा श्वासोच्छवास थांबल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच चंदन कुमार भागलपूरहून फुलवारीशरीफला पोहोचला आणि पोलिसांच्या मदतीने नवजीवन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. मात्र, तिथे त्याला त्याची बहीण बेडवर मृतावस्थेत आढळली. सुरभीच्या हत्येचा आरोप तिच्या पतीवर केला गेल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करत पोलीस ठाण्यात आणले. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाटणा येथील एम्स येथे पाठवला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर ही हत्या कशाप्रकारे करण्यात आली, याबाबत माहिती समोर येणार आहे. यासोबत त्याच्या पतीची चौकशी केली जात आहे. हेही वाचा -  महिलेचा पती नपुंसक; माजी IAS अधिकाऱ्याने सुनेला खोलीत बोलावलं अन्… नऊ महिन्याआधी सुरभीचे लग्न मोठ्या धुमधडाक्याने झाले होते. लग्नानंतर तिचा पती तिला तिच्या सावळ्या रंगावरुन टोमणे मारायचा. हेच टोमणे हळूहळू इतके बदलले की सुरभीची हत्या केली गेली. यानंतर तिचा भाऊ चंदनकुमारने हत्येचा आरोप तिच्या पतीवर लावला आहे. तसेच हुंडाबळीचाही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या