JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पत्नीला पाहिल्यावर प्रेयसीच्या बेडमध्ये लपला पती, नंतर घडला फिल्मी ड्रामा, वाचा सविस्तर...

पत्नीला पाहिल्यावर प्रेयसीच्या बेडमध्ये लपला पती, नंतर घडला फिल्मी ड्रामा, वाचा सविस्तर...

अंजलीला तिचा नवरा त्या घरात असल्याची पूर्ण शंका होती. अशा स्थितीत त्यांनी घरात चौकशी सुरू केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बागपत, 9 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये पती-पत्नीच्या वादाचे एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. एका पत्नीला तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याचा संशय आला होता. त्यामुळे तिने आपल्या पतीचा पिछा केला. तसेच आपल्या पतीला रंगेहाथ पकडण्यासाठी थेट त्याच्या प्रेयसीच्या घरी पोहोचली. यावेळी एक भलताच प्रकार समोर आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - मिळालेल्या माहितीनुसार, सिंघावली अहिर पोलीस स्टेशन हद्दीतील अमरपूर गढ़ी बसौद गावातील प्रेमसिंग यांची मुलगी अंजली हिचा विवाह 11 जून 2014 रोजी झाला होता. बरौत परिसरातील बरका गावात राहणाऱ्या सोमपाल यांचा मुलगा प्रवीण याच्यासोबत तिचा विवाह झाला होता. पती आणि त्याचे कुटुंबीय अनेक दिवसांपासून अंजलीचा हुंड्यासाठी छळ करत होते. यासोबतच प्रवीणचे अफेअरही सुरू होते. याचा अंजलीला संशय आला. अशा स्थितीत एके दिवशी प्रवीण प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेला तेव्हा अंजलीही तिच्या कुटुंबीयांसह मैत्रिणीच्या घरी पोहोचली. अंजलीला पाहताच प्रवीण घाबरला आणि प्रेयसीच्या बेडच्या बॉक्समध्ये लपला होता. अंजलीला तिचा नवरा त्या घरात असल्याची पूर्ण शंका होती. अशा स्थितीत त्यांनी घरात चौकशी सुरू केली. बेडचा बॉक्स उघडला असता पती प्रवीण तेथे लपून बसला होता. अंजलीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. तसेच पोलिसांना हा व्हिडिओ दाखवून मदतीची मागणी केली आहे. अंजलीच्या लग्नात कुटुंबीयांनी 8 लाख रुपये खर्च केले होते. त्यात रोख रक्कम आणि वस्तूही देण्यात आल्या होत्या. मात्र, असे असतानाही सासरचे लोक अंजलीचा हुंड्यासाठी छळ करत होते. ते तिच्याकडे एक लाख रुपयांची मोटारसायकल आणण्याची मागणी करत होते. तसेच अंजलीचा पती प्रवीण याचे शेजारील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. 4 ऑगस्ट रोजी अंजलीचे माहेरचे नातेवाईक आले होते. प्रवीण हा मैत्रिणीच्या घरी गेल्याचा अंजलीला संशय आला. अशा स्थितीत ती कुटुंबीयांसह मैत्रिणीच्या घरी पोहोचली. अंजली आल्याचे कळताच तिथे तिचा नवरा बेडच्या बॉक्समध्ये लपला. यावर अंजली आणि कुटुंबीयांनी त्याला शोधून त्याचा व्हिडिओ बनवला. हेही वाचा -  बलात्काराचा आरोपी मिर्ची बाबाला अटक; मोबाइलमध्ये अश्लील क्लिप अन् अनेक किळसवाणी कृत्य अंजलीची आई सुरेखा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांकडून कोणतेही सहकार्य केले जात नाही आहे. अंजलीच्या सांगण्यावरून मी प्रवीणच्या घरच्यांशी अनेकदा बोलले पण प्रवीणचं अफेअर सुरू असल्याचं मानायला ते तयार नव्हते. आता त्याचे पुरावेही सापडले आहेत. याप्रकरणी कठोर कारवाई करावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या