JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Honey Trap UP Police : प्रेमातून हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढायची नंतर लाखोंना फसवायची, कोण आहे ही बेगम?

Honey Trap UP Police : प्रेमातून हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढायची नंतर लाखोंना फसवायची, कोण आहे ही बेगम?

लोकांना हनी ट्रॅपचा बळी बनवणाऱ्या जाहिला बेगम या महिलेला उत्तर प्रदेशातील बांदा पोलिसांनी अटक केले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वाराणसी, 23 डिसेंबर : लोकांना हनी ट्रॅपचा बळी बनवणाऱ्या जाहिला बेगम या महिलेला उत्तर प्रदेशातील बांदा पोलिसांनी अटक केले आहे. अनेक दिवसांपासून ही महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी अश्लील चाळे करत होती. सुमारे 6 महिन्यांपूर्वी बांदा शहरातील रहिवासी असलेला सुप्रसिद्ध सराफा व्यावसायिक या महिलेच्या जाळ्यात आला होता. हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्यानंतर महिलेने शहरातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर तिचा व्हिडिओही बनवत त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला.

तेव्हापासून ती महिला सराफा व्यावसायिकाला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होती. या बदल्यात त्याच्याकडून सुमारे 50 लाख रुपयांची मागणी केली होती. दरम्यान तीला काही पैसे दिल्यानंतरही फसवणूक करणारी महिला व्यावसायिकाकडे सतत मोठ्या रकमेची मागणी करत होती. जर पैसे नाही दिले तर अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी वारंवार देत होती.

या त्रासाला कंटाळून सराफा व्यावसायिकाने राहत्या घराजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर या सगळ्या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी याची कसून चौकशी करत त्या महिलेला अटक करत पोलिसांनी तिला कारागृहात पाठवले.

संबंधित बातम्या

हे ही वाचाओळख, मैत्री, प्रेम, लिव्ह-इन, शरीरसंबंध अन् गर्भवती झाल्यावर मात्र…, अमरावतीच्या तरुणीसोबत काय घडलं?

अलीकडच्या काही दिवसांत ही महिला तुरुंगातून बाहेर आल्यावर तिने पुन्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनाव आणि शरीरप्रदर्शनाचा धंदा सुरू केला होता. पुन्हा लखनऊ येथील सहद गया गंज येथील रहिवासी इरसद शहाद खान याला जाळ्यात अडकवले होते. त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्याच्याशी अश्लील चॅटिंगही करू लागला. त्यानंतर सतत त्याच्या संपर्कात आल्यानंतर महिलेने त्यालाही ब्लॅकमेल करून 30 ते 40 लाख रुपये उकळले. यानंतर तरुणाने लखनौ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

जाहिरात

याप्रकरणी बांदा पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. तीन पथके स्थापन करून पोलीस महिलेचा शोध घेत होते. ती पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर बांदा पोलिसांनी महिलेची पुन्हा एकदा कारागृहात रवानगी केली आहे. फसवणूक करणारी महिला बांदा शहरातील जरैली कोठी, भागातील रहिवासी असून ती ब्युटी पार्लरच्या नावाखाली सर्व अश्लील काम करते.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास बांदा पोलिसांनी केला असून या महिलेची तुरुंगात रवानगी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधीक्षक बांदा यांनी सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  घरात घुसून 15 जणांचं महिला सरपंचासोबत धक्कादायक कृत्य, बुलडाण्याला हादरवणारी घटना

दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी एका सराफा व्यावसायिकाला ब्लॅकमेल केल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अलीकडच्या काही दिवसांत ही महिला पुन्हा लखनऊमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला ब्लॅकमेल करत होती, ज्याच्या तक्रारीनंतर महिलेला आज पुन्हा अटक करून तुरुंगात पाठवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या