नवी मुंबई, 08 जून : लग्नाचे आमिष दाखवून हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या एका उच्चशिक्षित भामट्याला नवी मुंबई (Navi Mumbai) पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे, या भामट्याने जीवनसाथी (jeevansathi )या मेट्रोमोनियल वेबसाईटच्या (Metromonial website)माध्यमातून 10 ते 15 महिलांवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश उर्फ करण गुप्ता (वय 32) असं या उच्चशिक्षित भामट्याचं नाव आहे. करण गुप्ता हा जीवनसाथी या मेट्रोमोनियल वेबसाईटच्या माध्यमातून तरुणींना गंडा घालत होता. लग्नाच्या या वेबसाईटवर करणने टोपण नावाने अकाउंट तयार करायचा. आपण एक बिझनेस मॅन आहोत, अशी ओळख तो दाखवायचा. ‘ते’ पत्र चोरण्यासाठी अजितदादांसोबत भाजपचे कोण कोण लोक होते? सेनेचा सवाल त्यानंतर चांगल्या प्रोफाईल बघून तो उच्चशिक्षित महिलांना लग्नाची मागणी घालत असे. ज्या महिला त्याला संपर्क करत असे त्यांना मॉल, रेस्टॉरंटमध्ये भेटण्यास बोलावून त्यांच्याशी जवळीक साधायचा. एवढंच नाहीतर संधी साधून विनयभंग किंवा शारिरीक अत्याचार करण्याचा प्रयत्न करायचा. या भामट्याने आतापर्यंत 10 ते 15 महिलांवर लैगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
करण याने काही काळ हॅकर म्हणून काम केले होते. त्यामुळे तो एकावेळी एकच सिमकार्ड वापरायचा. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून हा भामटा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून करण गुप्ताला बेड्या ठोकल्या. त्याच्याविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मेट्रोमोनियल वेबसाईटच्या माध्यमातून फसवणाऱ्या अश्या भामट्यां पासून सावध राहण्याचे आवाहन नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे पोलिसांनी केलंय.