हिंगोलीच्या तरुणासोबत घडलं भयंकर
मनिष खरात, प्रतिनिधी हिंगोली, 20 जुलै : एकमेकांवर जीवापाड प्रेम पण अखेर तरुणीच्या घरच्यांनी तरुणाचा खेळ खल्लास केला. त्याची सगळी स्वप्न धुळीला मिळवली आणि भयंकर घडलं. प्रेम प्रकरणातून तरुणीच्या नातेवाईकांनी मुलाची हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. वडिलांनी आपल्या मुलाला न्याय मिळण्यासाठी न्यायालयाची पायरी चढली आणि त्यानंतर सगळी चक्र फिरली. न्यायालयाने आदेश काढला आणि त्या नंतर तरुणीच्या घरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमप्रकरणातून तरूणीच्या नातेवाईकांनी प्रियकर असणाऱ्या तरुणाला मारहाण करून विष पाजून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात वाशिम जिल्ह्यातील खंडाळा गावात घडल्याची माहिती मिळाली आहे.
चार महिन्यांपूर्वी घडलेल्या या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करूनही गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र मयत तरूणाच्या वडिलांनी त्यांचा मुलगा मिलिंद सुर्वे यांची हत्या झाल्याचा आरोप केला. त्यानंतर तरुणीच्या घरच्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने या प्रकरणात मुलीचे नातेवाईक असलेल्या आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुलीचे नातेवाईक असलेल्या आठ आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. सचिन वानखेडे, प्रफुल्ल खिल्लारे, नितीन खिल्लारे, प्रमोद खिल्लारे, विजय खिल्लारे, विजय खिल्लारे, भास्कर खिल्लारे, तरुणीची आई अशा आठ जणांविरोधात कलम 302, 143, 144, 147,159, 148, 34 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.