JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / School Fees वरुन मुख्याध्यापकांनी सर्वांसमोर केला अपमान; शेवटी रडत रडत विद्यार्थिनीने सोडला जीव

School Fees वरुन मुख्याध्यापकांनी सर्वांसमोर केला अपमान; शेवटी रडत रडत विद्यार्थिनीने सोडला जीव

या प्रकारामुळे निराश झालेली स्मृती रडत रडत घरी पोहोचली आणि बेशुद्ध पडली. नेमकं काय घडलंय हे तिच्या कुटुंबीयांना कळेपर्यंत तिचा मृत्यू झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

उन्नाव, 6 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) उन्नाव (Unnao) येथील हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या स्मृती अवस्थी (Smriti Avasthi) या विद्यार्थिनीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. सरस्वती विद्यामंदिरात (Sarswati Vidyamandir) ती शिकत होती. तिची फी (School Fees) भरली न गेल्यामुळे शाळेच्या व्यवस्थापनाकडून तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता, असा आरोप केला जात आहे. फी-माफीची विनंती करणारं पत्र घेऊन स्मृती शाळेचे मुख्याध्यापक सत्येंद्र शुक्ला (Satyendra Shukla) यांच्याकडे गेली होती; मात्र त्यांनी ते पत्र स्वीकारण्यास नकार दिला होता. शुक्ला यांनी स्मृतीचा चारचौघांत अपमान करून तिला तिथून हाकलून लावलं, असा आरोप आहे. या प्रकारामुळे निराश झालेली स्मृती रडत रडत घरी पोहोचली आणि बेशुद्ध पडली. नेमकं काय घडलंय हे तिच्या कुटुंबीयांना कळेपर्यंत तिचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्मृतीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी (Post Mortem) पाठवला. या प्रकरणाचा तपासही पोलिसांनी सुरू केला. मुलीच्या वडिलांनी सरस्वती विद्यामंदिर शाळेचं व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी कोतवाली पोलिस ठाण्यात मुख्याध्यापक सत्येंद्र शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे. हे ही वाचा- शेवटचं गंगेच्या घाटावर पाहिलं; सकाळी छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळलं चिमुरडीचं शव उन्नाव शहरातल्या कोतवाली (Kotwali) भागातल्या आदर्शनगर मोहल्ल्यातली ही घटना आहे. स्मृतीचे काका रमेश अवस्थी यांनी सांगितलं, की स्मृती त्या शाळेत 10व्या इयत्तेत शिकत होती. कोरोना आणि लॉकडाउनमुळे कुटुंबाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे तिची तीन महिन्यांची फी भरता आली नव्हती. म्हणून फी-माफी मिळण्याची विनंती करणारं पत्र घेऊन स्मृती शाळेत गेली होती; मात्र मुख्याध्यापकांनी ते पत्र तर घेतलं नाहीच; शिवाय चारचौघांत तिचा अपमान करून तिला हाकलून दिलं. रडत घरी आल्यानंतर स्मृती बेशुद्ध झाली. पाण्याचे हबके मारूनही ती उठेना. म्हणून तिला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं; मात्र ती मृत असल्याचं डॉक्टर्सनी घोषित केलं. सुमारे 15 वर्षं वय असलेल्या स्मृतीचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. त्यामुळे तिचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला असून, कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या