व्हिडिओ कॉल स्कॅम
नवी दिल्ली, 16 जून : आधी व्हिडिओ कॉलवर मैत्री, नंतर फसवणूक आणि नंतर सेक्सटोर्शन. ज्याच्या आयुष्यात हे तीन शब्द आले त्यांचं जीवन नरक झाल्याशिवाय राहत नाही. असाच काहीसा प्रकार गुरुग्राममधील एका 25 वर्षीय मुलासोबत घडला आहे. हा मुलगा एका निवृत्त न्यायाधीशांचा मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे. तो त्याच्या वडिलांसोबत चेंबरमध्ये बसला होता तेव्हा त्याच्या व्हॉट्सअॅपवर एक व्हिडिओ कॉल आला. कॉलच्या दुसऱ्या बाजूला एक मुलगी होती जी अंगावरील एक एक कपडा उतरवताना दिसत होती. वडिलांसोबत बसलेल्या मुलाची अक्कल बंद झाली आणि तो बेशुद्ध पडला. त्याच्या हृदयाची धडधड अचानक वाढली. सेवानिवृत्त न्यायाधीशांनी पोलिसांना दिलेल्या अहवालात सांगितले आहे की, सकाळी 9.30 वाजता कथित कॉल आला, जेव्हा ते आणि त्यांचा मुलगा सेक्टर 17 मधील त्यांच्या चेंबरमध्ये बसले होते. त्यांनी सांगितले की, कॉल येताच त्यांच्या मुलाने पाहिले की कॉलच्या पलीकडे एक मुलगी होती जी तिचे कपडे काढत होती. हे पाहून त्यांचा मुलगा घाबरला आणि त्याने कॉल कट केला. कॉल डिस्कनेक्ट होताच धमकी सेवानिवृत्त न्यायाधीशांनी सांगितले की, कॉल डिस्कनेक्ट होताच कॉल आणि व्हॉट्सअॅपवर पैशांची मागणी करण्यात आली. तसे न केल्यास अश्लिल फोटो इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. निवृत्त न्यायाधीश पुढे म्हणाले, “काही समाजकंटक त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असून पैसे काढण्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर हॅक करू शकतात.” वाचा - ‘इस्लाम स्वीकार नाहीतर मी तुला गोळ्या घालीन’ 13 वर्षीय मुलीला धमकी, दोन तरुणांना अटक तुमच्यासोबत असे काही घडल्यास काय करावे? तुमच्यासोबत असे काही घडत असेल तर तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही. सेक्सटोर्शनला बळी पडण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकरणात पहिल्यांदा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जा आणि आयटी अॅक्टमधील कलम 67A आणि आयपीसीच्या कलम 292 अंतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवा. अशाच प्रकारे सेवानिवृत्त न्यायाधीशांनी गुरुग्रामच्या सेक्टर 18 पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.