JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / गर्लफ्रेंड म्हणाली, तुझ्या सुसाइडची बातमी TV वर दाखव; प्रियकराने केलं मान्य अन्...

गर्लफ्रेंड म्हणाली, तुझ्या सुसाइडची बातमी TV वर दाखव; प्रियकराने केलं मान्य अन्...

पत्रकाराने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना धक्काच बसला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटना, 29 जुलै : बिहारमधील एका वृत्तपत्राच्या पत्रकाराने प्रेम प्रकरणात स्वत:वर गोळी चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्रकाराने प्रेयसीने सांगितल्यानंतर बंदुकीने स्वत:वरच गोळी चालवती. जखमी अवस्थेत पत्रकाराला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आलं. येथे त्याची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी दुसरीकडे रेफर केलं. या घटनेची माहिती मिळताच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार विशाल कुमार यांचं वंदना सिंह यांच्यासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. पत्रकाराचं कुटुंबीय आणि मित्र त्याच्या या नात्यातून दूर जाण्यासाठी सांगत होतं. मात्र तो कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्या दिवशी त्याची गर्लफ्रेंड म्हणाली की, ती घरात आपल्या आईसोबत आहे. जर त्याच्यात हिंमत असेल तर तुझ्या सुसाइडची बातमी आता टिव्हीवर दाखव. यानंतर पत्रकाराने त्याच्याजवळ असलेली एक पिस्तूल काढली आणि स्वत:वर गोळी झाडली. यानंतर पत्रकार गंभीर जखमी झाला. यानंतर विशालला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. येथे त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. प्रेयसीकडून मानसिक छळ स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून पत्रकाराने धक्कादायक पाऊल उचललं. इतकच नाही तर प्रेयसीचे कुटुंबीय विशालवर आरोप-प्रत्यारोप लावत होते आणि त्याचा मानसिक छळ करीत होते. यातूनच त्याने स्वत:वर गोळी झाडली. पत्रकाराचा जीव वाचावा, यासाठी प्रार्थना केली जात आहे. स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी विशालने एक सुसाइड नोटदेखील लिहिली आहे. पोलीस सध्या या सुसाइड नोटचा तपास करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या