JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीला चौथ्या मजल्यावरून फेकलं खाली अन् मृतदेह घेऊन पळून गेला!

प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीला चौथ्या मजल्यावरून फेकलं खाली अन् मृतदेह घेऊन पळून गेला!

पोलिसांनी आरोपी तरुणाला रुग्णवाहिकेमधील मृतदेहासह मेरठ जवळून अटक केली आहे.

जाहिरात

पोलिसांनी आरोपी तरुणाला रुग्णवाहिकेमधील मृतदेहासह मेरठ जवळून अटक केली आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली 09 नोव्हेंबर : दिल्लीजवळच्या नोएडामध्ये एकतर्फी प्रेमाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीला एका माथेफिरू तरुणाने चौथ्या मजल्यावरून फेकून दिलं, नंतर तो तिचा मृतदेह घेऊन पळून गेला. पोलिसांनी आरोपी तरुणाला रुग्णवाहिकेमधील मृतदेहासह मेरठ जवळून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आरोपी हा तरुणीला गेल्या काही दिवसांपासून त्रास देत होता, असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती, परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे तिचा जीव घेण्यापर्यंत त्याची हिंमत गेली, असा आरोप कुटुंबीयांनी केलाय.

(घराच्या भिंतीसाठी रक्ताची नाती जीवावर उठली, मोठ्या भावाने वडील आणि लहान भावावर केले चाकूने वार!)

आरोपी तरुणाचे नाव गौरव आहे. तो विवाहित असून, कोतवाली 49 परिसरातील होशियारपूर गावात राहणाऱ्या शीतल या 22 वर्षांच्या तरुणीवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. शीतलचा भाऊ कुणाल याने सांगितलं की, शीतल आणि त्याचे कुटुंबीय गौरवच्या कृत्यामुळे कंटाळले होते. त्यामुळे त्यांनी या पूर्वी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली होती, परंतु पोलिसांनी कोणतीही कठोर कारवाई केली नाही, उलट तडजोडीसाठी दबाव टाकला आणि तो काहीच करणार नाही, असं म्हटलं.

मृत शीतल होशियारपूरमधील शर्मा मार्केटमध्ये एका विमा कंपनीत काम करत होती. आज (9 नोव्हेंबर 2022 रोजी) गौरव तिच्या मागे गेला. शीतलने त्याच्या प्रेमाला नकार दिल्यानंतर तिला चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं. त्यानंतर तो खाली आला आणि स्वत: शीतलचा भाऊ असल्याचे सांगून हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या नावाखाली तिचा मृतदेह कारमध्ये घेऊन पळून गेला.

(सिरिअल बनवण्याच्या बहाण्याने अश्लील फिल्म शूट, शहापूरमधील प्रकाराने खळबळ)

दरम्यान, चौथ्या मजल्यावरून मुलगी पडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. तेव्हा कुटुंबीयांनी गौरव हा मुलीचा भाऊ नसून तिला त्रास देणारा माथेफिरू असल्याचं सांगितलं. नंतर पोलिसांनी नोएडातील रुग्णालयात शीतलचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्यामुळे पोलिसांनी गौरवचा मोबाइल ट्रॅक केला आणि नंतर त्याला मेरठ कंकरखेडाजवळ एका रुग्णवाहिकेतील मृतदेहासह ताब्यात घेतलं. शीतलचा मृतदेह बिजनौरला नेऊन जाळण्याचा प्लॅन असल्याचं आरोपी गौरवने सांगितलं. तसंच आपण शीतलशी लग्न केलं होतं; पण आता ती माझ्यापासून दूर जात होती, त्यामुळे हे कृत्य केल्याचं आरोपीने म्हटलंय.

शीतलच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गौरवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असं नोएडा झोनचे एडीसीपी आशुतोष द्विवेदी यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या