JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / ..नाहीतर तुझे 'ते' व्हिडिओ व्हायरल करेन! धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर 4 वर्ष बलात्कार

..नाहीतर तुझे 'ते' व्हिडिओ व्हायरल करेन! धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर 4 वर्ष बलात्कार

खाजगी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर तब्बल चार वर्ष अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.

जाहिरात

धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर 4 वर्ष बलात्कार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आशिष कुमार शर्मा, प्रतिनिधी दौसा, 3 जून : तुझे अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर सतत 4 वर्ष बलात्कार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना राजस्थानच्या दौसा भागात घडली. पीडितेच्या तक्रारीनंतर हे प्रकरण लालसोट पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, ‘मला न्याय द्या, नाहीतर मी आत्महत्या करेन’, अशी धमकीच पीडितेने तक्रारीत दिली आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, अजबपुरा गावात राहणारा हंस कुमार हा 2019 साली तिला त्याचं घर दाखवण्यासाठी घेऊन गेला होता. त्यावेळी त्याने तिच्या ज्यूसमध्ये काहीतरी मिसळलं. ज्यूस प्यायल्यावर तिला चक्कर आली आणि आरोपीने तिला शेतात नेलं. तिथे तिच्यावर अत्याचार करून तिचे अश्लिल फोटो, व्हिडिओ काढले. त्यानंतर तो तिला सतत हे फोटो, व्हिडिओ व्हायरल करेन अशा धमक्या द्यायचा. रात्री 10 वाजता घरातून घेऊन जाऊन तो तिच्यावर जबरदस्ती करायचा. त्यामुळे पीडितेने त्याला ‘माझ्याशी लग्न कर’, असं सांगितलं. परंतु तू अजून लहान आहेस, वयात येशील तेव्हा लग्न करेन असं तो म्हणायचा. मात्र त्याचदरम्यान पीडितेच्या घरच्यांनी तिचं दुसरीकडे लग्न लावून दिलं. त्यावेळी आरोपीने, तू लग्न कर पण सासरी जाऊ नको नाहीतर फोटो, व्हिडिओ व्हायरल करेन, अशी भीती तिला दाखवली. त्यामुळे घाबरून पीडिता लग्न झालेलं असतानाही माहेरीच राहायची. परंतु अखेर आरोपीने तिचे फोटो, व्हिडिओ तिच्या सासरच्या मंडळींना पाठवले आणि तिचं लग्न मोडलं. मग तिने त्यालाच लग्नाची गळ घातली, परंतु त्याने दुसऱ्याच मुलीशी लग्न केलं आणि पीडितेचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. वाचा - Mira Bhayandar Crime : हातावर त्रिशूल अन् ओमच्या टॅटूने फुटलं पतीचं बिंग; भावाच्या मदतीने पत्नीसोबत धक्कादायक कृत्य याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पीडितेने ‘माझं पूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं असून मला न्याय द्या, नाहीतर मी आत्महत्या करेन’, अशी मागणी न्याय व्यवस्थेकडे केली आहे. आता या पीडितेची वैद्यकीय चाचणी सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या