JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / संतापजनक! फेसबुकवरील मैत्रीचे रुपांतर प्रेमात, नंतर प्रेयसीवर केला सामूहिक बलात्कार

संतापजनक! फेसबुकवरील मैत्रीचे रुपांतर प्रेमात, नंतर प्रेयसीवर केला सामूहिक बलात्कार

फेसबुकवर मैत्री केल्यानंतर मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ऐजाज अहमद गिरिडीह, 2 जुलै : झारखंडच्या गिरिडीह (Giridih) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील महादेव टांड़ गांवात एका युवतीने आपल्या प्रियकरासह त्याच्या दोन मित्रांवर सामूहिक बलात्काराचा (Facebook friend gangrape) आरोप केला आहे. याप्रकरणी तिने तीसरी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली. नेमकं काय घडलं -  पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, फेसबुकवर मैत्री केल्यानंतर मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. यानंतर प्रियकराने तिला लग्नाचे आमिश देऊन प्रियकराने आपल्या दो मित्रांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेच्या प्रियकराचे नाव साजिद अंसारी आहे. तीन वेळा भेटायला बोलावले -  मागच्या वर्षी त्याने फेसबुकवर पीडितेशी संपर्क केला होता. यादरम्यान, त्याने तिचा मोबाईल नंबरही घेतला होता. एका वर्षानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दिले. तसेच 13 जूनला भेटायला एका शाळेत बोलावले. तसेच रात्रभर तिला त्या शाळेतच ठेवले आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. लग्नाचा विषय काढल्यावर तो म्हणाला की, पैशांची व्यवस्था करतो. असे सांगून तो निघून गेला. नंतरही फोन करुन तो तिला पारसनाथला घेऊन गेला. तिथेही त्याने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले. हेही वाचा -  नवविवाहितेला हव्या होत्या बांगड्या, बाजारात पतीचा हात सोडला अन् प्रियकरासोबत काढला पळ

तिसऱ्या वेळी त्याने तिला कबुतरी पर्वताच्या जवळ फोन करुन बोलावले. तसेच म्हणाला की, 24 जूनला लग्न करायचे आहे. पीडित मुलगी तिथे पोहोचल्यावर त्याचा मित्र मोहम्मद इरफान आणि मोहम्मद नरसुला हेदेखील तिथे उपस्थित होते. यानंतर त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

इतके झाल्यावर सुद्धा पीडितेने तिच्या प्रियकराकडे लग्नाची करण्याबाबत सांगितले. आतातरी लग्न करूया, असे ती त्याला म्हणाली. मात्र, त्याने तिला शिवीगाळ केली आणि लग्नाला नकार दिला. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या