JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / आरक्षित तिकिट अन् जेवणाचे आमिष दिले, नंतर महिलेला निर्जन स्थळी नेत सामूहिक बलात्कार

आरक्षित तिकिट अन् जेवणाचे आमिष दिले, नंतर महिलेला निर्जन स्थळी नेत सामूहिक बलात्कार

पीडित महिला आणि तिचा पती हे दिल्लीला रेल्वेने जात होते. याचदरम्यान, पीडित महिला ही काही वस्तू खरेदी करण्यासाठी स्टेशनच्या बाहेर आली.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जयपूर, 26 ऑगस्ट : देशात बलात्कार, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्रातील एका महिलेवर जयपूर रेल्वे यार्ड परिसरात सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. पीडित महिलेचे वय 35 आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा पती हे दिल्लीला रेल्वेने जात होते. याचदरम्यान, पीडित महिला ही काही वस्तू खरेदी करण्यासाठी स्टेशनच्या बाहेर आली. मात्र, तिथेच तिची फसवणूक झाली. याठिकाणी या महिलेला एका व्यक्तिने मी तुम्हाला रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळून देतो, असे सांगितले. तसेच यानंतर त्या त्याने रेल्वे यार्डजवळ असलेल्या एका निर्जनस्थळी नेले. याठिकाणी आधीच तीन ते चार जण दबा धरुन बसले होते. त्या सर्वांनी या महिलेवर बलात्कार केला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी आहे. तसेच तिचे जयपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तिसोबत सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी कलम 376 (डी) अंतर्गत सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर तपासादरम्यान या महिलेने त्यातील एका तरुणाला ओळखत असल्याचे म्हटले आहे. हेही वाचा -  कोल्हापूर : इन्स्टाग्रामवर ओळखीतून लग्नाचे आमिष, नंतर अल्पवयीन मुलीला पळवून नेत आठ दिवस धक्कादायक प्रकार महिलेने दिलेल्या घटनाक्रमनुसार, पोलिसांनी सर्व सीसीटी कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले आहे. तसेच त्याआधारावर पोलीस तपास करत आहे. या महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, मेडीकल रिपोर्टनंतरच तपासाची पुढील दिशा स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र, अद्याप एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या