JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / लाजिरवाणी घटना! नराधमांनी रुग्णालाही सोडलं नाही, कोरोनाबाधित तरुणीवर सामूहिक बलात्कार

लाजिरवाणी घटना! नराधमांनी रुग्णालाही सोडलं नाही, कोरोनाबाधित तरुणीवर सामूहिक बलात्कार

चोरीच्या उद्देशानं घरामध्ये घुसलेल्या तीन नराधमांनी चाकूचा धाक दाखवत तरुणीवर बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही तरुणी कोरोनाबाधित (Rape on Corona Positive Woman) असल्यानं होम क्वारंटाईन (Home Quarantine) होती.

जाहिरात

काकाचं भूत अंगात शिरल्याचं सांगत अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार, भिवंडीतील धक्कादायक घटना (प्रातिनिधिक फोटो)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ 15 मे : कोरोनाकाळात (Corona Pandemic) काळाबाजार आणि पैशांची लूट अशा अनेक घटना सतत समोर येत आहेत. मात्र, आता एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये चोरीच्या उद्देशानं घरामध्ये घुसलेल्या तीन नराधमांनी चाकूचा धाक दाखवत तरुणीवर बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही तरुणी कोरोनाबाधित (Rape on Corona Positive Woman) असल्यानं होम क्वारंटाईन (Home Quarantine) होती. हैवानांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करत 50 हजार रोकड आणि मोबाईलही लंपास केला आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या इंदौरमधील आहे. पोलिसांनी शनिवारी सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) मदतीनं यातील दोन आरोपींना अटक केली आहे. तर, तिसरा आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. पीडितेनं एसएसपी राजेश रघुवंशी यांना सांगितलं, की कोरोनाबाधित असल्यानं ती एकटीच घरी थांबली होती. गुरुवारी रात्री दोन वाजता तिला जाग आली तेव्हा तिच्या बेडशेजारी तीन लोक उभा होते. या चोरांनी चाकूचा धाक दाखवत तिला पैसे आणि दागिने मागितले. तरुणीनं त्यांना 50 हजार रुपये आणि दोन मोबाईल दिले. यानंतर तिघांनीही तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. मात्र, कोरोनामुळे अशक्तपणा आल्यानं ती त्यांना विरोधही करू शकली नाही. पीडितेनं सांगितलं, की त्यांच्या हातात चाकू आणि कात्री असल्यानं हत्येच्या भितीमुळे तिनं कोणालाही आवाज दिला नाही. पीडितेनं सांगितलं, की यानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत एक आरोपी या तरुणीच्या घराबाहेरच थांबला. जेणेकरुन तिनं पोलिसांकडे जाऊ नये. सकाळ होताच आरोपीनं याठिकाणाहून पळ काढला. इंदौरच्या लसूडिया ठाणा क्षेत्रातील पंचवटी कॉलनीत राहाणाऱ्या 37 वर्षीय युवतीच्या घरी गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच शुक्रवारी सकाळी पोलिसांनी युवतीची मेडिकल टेस्ट केली. तिच्या तक्रारीनुसार तीन अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करुन घेण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली. यानंतर आरोपींना दोन आरोपींना ताब्यात घेतलं. दोघांनीही आपला गुन्हा मान्य केला असून ते दोघंही अल्पवयीन आहेत. यातील एकाच नाव दीपक असून तो युवतीचा शेजारीच आहे. तरुणी घरी एकटी असल्याचं पाहूनच त्यानं ही योजना आखली होती. दीपक अजूनही फरार आहे. त्याची माहिती देणाऱ्यासाठी 20 हजाराचं बक्षीस जाहीर कऱण्यात आलं आहे. दोन महिन्यांआधीच तो तुरुंगातून बाहेर आला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या