JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / घृणास्पद! SUV कार आणि 5 लाख दिले नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांकडून विवाहितेवर बलात्कार

घृणास्पद! SUV कार आणि 5 लाख दिले नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांकडून विवाहितेवर बलात्कार

24 वर्षीय तरुणीचं 3 वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं. तिने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार पोलिसांना सांगितला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरोहा, 9 ऑगस्ट : सरकारकडून कायम महिला सबलीकरणासाठी केलेल्या कामाचा पाढा वाचला जातो. त्यांनी केलेल्या योजना आदी बऱ्याच गोष्टींचा उदोउदो केला जातो. मात्र अद्यापही प्रत्यक्षात परिस्थिती पाहिली तर ती अंगावर काटा आणणारी आहे. शहरांमध्ये राहणाऱ्यांना वाटत असेल की आता हुंडाबळीसारख्या कुप्रथा नष्ट झाल्या आहेत. मात्र अद्यापही देशात महिलांना हुंड्यासाठी त्रास दिला जातो. अशीच एक घटना उत्तरप्रदेशातून समोर आली आहे. एका 24 वर्षी तरुणीने हुंडा दिला नाही म्हणून कुटुंबातील 12 जणांविरोधात सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. यासंदर्भात महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सामूहिक बलात्कारासह, क्रौर्य, अनैसर्गिक गुन्हा आणि महिलेला गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे. याअंतर्गत महिलेच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कथित स्वरुपात बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीने सांगितलं की, तिच्या पतीच्या कुुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या मित्रांनी सांगितलं की, जर पतीला हुंड्यात एक एसयूव्ही कार आणि 5 लाख रुपये नाही दिले तर हे सुरूच राहिल. हे ही वाचा- प्रायव्हेट पार्ट आधी जळावा म्हणून चितेवर उलटा ठेवला चिमुरडीचा मृतदेह महिलेने गाठलं पोलीस स्टेशन महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, 3 वर्षांपूर्वी माझं लग्न झालं होतं. माझ्या आई-वडिलांनी आधीच हुंड्याच्या रुपात बरच काही दिलं होतं. काही महिन्यांनंतर माझे पती आणि त्यांच्या कुटुंबाने 5 लाख रुपयांची कॅश आणि एक लग्जरी कारची मागणी केली. मात्र मी याचा विरोध केला. त्यानंतर त्यांनी मला त्रास द्यायला सुरू केलं. पुढे महिलेने लिहिलं आहे की, जेव्हा मी गर्भवती झाली तेव्हा त्यांनी मला गर्भपात करायला जबरदस्ती केली. त्यांनी मला मारहाण सुरू केली. शेवटी मी माहेरी निघून गेली. मात्र सासरची मंडळी माझ्या माहेरी आले व माझं मन बदलून मला सासरी घेऊन गेले. गेल्या आठवड्यात कुटुंबातील व त्यांचे मित्र अशा 12 जणांनी माझ्यावर सामूहिक बलात्कार केल्याचंही तिने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. यानंतर तिने आपल्या पतीला याबाबत सांगितलं तर तो म्हणाला की, जर तुझ्या वडिलांनी एसयूवी कार आणि पाच लाख रुपये दिले नाही तर हे सुरूच राहील. त्यानंतर ती आपल्या आई-वडिलांकडे निघून गेली.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या