गडचिरोलीत तीन जहाल तीन माओवाद्यांना बेड्या
गडचिरोली, 28 ऑगस्ट : गडचिरोली पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. पोलिसांनी तीन जहाल माओवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. भामगरागड तालुक्यातील कोयार जंगलातून पोलिसांनी या तीन जहाल माओवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे या तीनही माओवाद्यांवर तब्बल 10 लाखांचं बक्षीस होतं. या आरोपींवर 7 खूनांचा आरोप आहेत. तसेच त्यांच्यावर एक-दोन नव्हे तर तब्बल 24 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या माओवाद्यांमध्ये अर्जुन उर्फ महेश नरोटे या जहाल माओवाद्याचा समावेश आहे. त्याच्यावर दोन लाखाचे बक्षीस होतं. हा आरोपी भामरागड दलमचा सदस्य आहे. ( एसटी बसमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा दारूच्या नशेत धिंगाणा, बस वाहकालाही अश्लील शिवीगाळ ) दुसरीकडे पोलिसांनी अटक केलेला आरोपी रमेश पल्लो हा कंपनीत दहाचा अॅक्शन टीमचा सदस्य आहे. त्याच्यावर तीन खुनासह एकूण 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर चार लाखांचं बक्षीस होतं. दरम्यान या दोघांसोबत तानी उर्फ शशी पुंगाटी या महीला माओवादीला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर 4 खुनांसह सात गुन्ह्यांचा समावेश आहे. ती प्लाटुन क्र सातची सदस्य होती. तिच्यावर चार लाखांचे बक्षीस आहे. या तिघांच्या अटकेने माओवादी चळवळीला धक्का बसला आहे.