JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Instagram वर बनवलं फेक आयडी अनं तिला ओढलं जाळ्यात, पुढं जे घडलं ते हादरवणारं..

Instagram वर बनवलं फेक आयडी अनं तिला ओढलं जाळ्यात, पुढं जे घडलं ते हादरवणारं..

एका तरुणीसोबत सोशल मीडियावरील एका मित्राने धक्कादायक कृत्य केले.

जाहिरात

file photo

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

केबी शुक्ला, प्रतिनिधी अयोध्या, 21 जून : एका विशिष्ट समाजातील तरुणाने आपली ओळख लपवली आणि अल्पवयीन मुलीशी ओळख करून तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिची अश्लील छायाचित्रे काढल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ आरोपी तरुणाला अटक केली. ही घटना उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात घडली. काय आहे संपूर्ण प्रकरण - असा आरोप करण्यात आला आहे की, आधी आरोपी नराधम तरुणाने आपला धर्म बदलवून एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री केली. इंस्टाग्रामच्या मदतीने इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख वाढवल्यानंतर तरुणाने गोड बोलून फसवले. तसेच तिच्यासोबत दुष्कर्म केले. यानंतर या संपूर्ण घटनेचे अश्लील फोटोही या तरुणाने काढले. या घटनेनंतर पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपी तरुणाविरोधात गोसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

याप्रकरणी प्रभारी निरीक्षक थाना गोसाईगंज संतोष सिंह यांनी सांगितले की, मो. अर्श मो. मुस्ताक (वय- 22) याला 19 जूनला रात्रीच्या सुमारास गोसाईगंज अयोध्या येथील टण्डौली रेल्वे क्रासिंग येथून अटक करण्यात आली. यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. आरोपीने फिर्यादीच्या मुलीवर बलात्कार करून इन्स्टाग्रामवर फेक आयडी बनवून सोशल मीडियावर अश्लील फोटो/व्हिडीओ अपलोड केले. याप्रकरणी कलम 376 भादवी आणि 66 ई/67 आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून कारागृहात पाठवले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या