फोटो क्रेडिट - लोकमत
मॉक्स्को, 26 सप्टेंबर : रशियातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज सोमवारी मध्य रशियातील एका शाळेत भीषण गोळीबार झाला. या धक्कादायक घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक विद्यार्थी जखमी झाले. या गोळीबारानंतर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीनेही स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. काय आहे संपूर्ण प्रकरण - रशियातील मीडिया संस्था आरटीने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी इझेव्हस्क शहरातील एका शाळेत झालेल्या गोळीबारात 13 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार, पीडितांपैकी 7 हे शहरातील शाळा क्रमांक 88 चे विद्यार्थी आहेत. हल्ल्यानंतर बंदूकधाऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती रशियाच्या तपास समितीने सांगितले. तसेच त्याची ओळख पटवली जात आहे. संशयिताने स्की मास्क आणि नाझी चिन्ह असलेला काळा टी-शर्ट घातल्याचे सांगण्यात आले. उदमुर्तिया प्रजासत्ताकाचे गव्हर्नर अलेक्झांडर बुर्चालोव्ह यांच्या मते, पीडितांपैकी एकाची ओळख शाळेचा सुरक्षा रक्षक म्हणून झाली आहे." त्याचवेळी, शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ज्या शाळेत गोळीबार झाला ती शाळा रिकामी करण्यात आली आहे. हेही वाचा - बड्या नेत्यांना घेऊन जाणारं Helicopter Crash, विजेच्या तारेचा स्पर्श होताच…; अंगावर काटा आणणारा Video या घटनेच्या व्हिडिओ फुटेजमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक इमारतीमधून पळत असल्याचे दिसत आहे. यासोबतच जखमींना स्ट्रेचरवॉर्नरला आजारी लोक घेऊन जात आहेत. रशियन रिपब्लिक ऑफ उदमुर्तियाची राजधानी इझेव्हस्कमध्ये 630,000 लोक राहतात.