JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / ड्रग्ज न मिळाल्याने 3 मुलींच्या बापाची आत्महत्या, डोक्यात झाडून घेतली गोळी

ड्रग्ज न मिळाल्याने 3 मुलींच्या बापाची आत्महत्या, डोक्यात झाडून घेतली गोळी

ड्रग्ज न मिळाल्याने 3 मुलींची जबाबदारी असणाऱ्या (Father of 3 girls commit suicide after not getting drugs) बापाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंदिगड, 21 सप्टेंबर : ड्रग्ज न मिळाल्याने 3 मुलींची जबाबदारी असणाऱ्या (Father of 3 girls commit suicide after not getting drugs) बापाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. व्यसन एखाद्या व्यक्तीला कुठल्या (Effects of addiction) थराला नेऊ शकतं, याचं उदाहरणच यातून दिसून आलं आहे. चिट्टा नावाच्या अंमली पदार्थाचं (Drugs) या व्यक्तीला व्यसन जडलं होतं. मात्र त्याच्याकडचे पैसे संपल्यामुळं हे महागडं ड्रग त्याला मिळू शकलं नाही. त्यामुळे त्याच्या मानसिक अवस्थेवर परिणाम झाला आणि देशी कट्ट्याने स्वतःवर गोळी झाडून त्याने आत्महत्या केली. ड्रग्जची लागली सवय हरियाणातील प्रीतनगर भागात राहणाऱ्या भूप सिंह नावाच्या व्यक्तीला चिट्टाची सवय लागली होती. भूप सिंह सध्या त्याच्या सासूरवाडीत राहत होता. मेहुण्याच्या निधनानंतर त्याने पत्नीसोबत सासरी येऊन राहण्याचा निर्णय़ घेतला होता. तिथेही त्याची नशा सुरुच होती. मात्र त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे त्याला अंमली पदार्थ विकत घेणे शक्य होत नव्हते. याच्या वैफल्यातून त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली. भूप सिंहला तीन मुली आहेत. त्याच्या एका मुलाने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. ड्रग्जसाठी असायचा बेचैन भूप सिंह हा ड्रग्जसाठी सतत बेचैन असायचा. त्याला ड्रग्ज मिळालं नाही की तो पत्नीला आणि मुलींनाही मारहाण करत असे. या ड्रग्जचा त्याच्यावर एवढा अंमल झाला होता की त्याच्याविना चैन पडत नसे. हे वाचा - महिलेनं पतीला मारण्यासाठी रचला कट; प्रोटीन पाउडरमधून द्यायची विष,असा झाला खुलासा काय आहे चिट्टा? हरियाणात हेरॉईनला चिट्टा असं म्हटलं जातं. चिट्टाचा अर्थ होतो पांढरा. या ड्रग्जच्या पांढऱ्या रंगावरून त्याला चिट्टा हे नाव पडलं आहे. या ड्रग्जची किंमत सोन्यापेक्षाही महाग असते. सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 48 हजार रुपये आहे, तर 10 ग्रॅम हेरॉईन 60 हजार रुपयांना मिळतं. 1 ग्रॅम हेरॉईन खरेदी केल्यावर दोन ते तीनदा त्याची नशा करता येते. हे ड्रग 8 ते 10 वेळा घेतल्यानंतर शरीराला त्याची सवय होते आणि त्यानंतर त्याचं व्यसन लागतं. एकदा लागलेलं व्यसन सोडवणं अत्यंत कठीण असतं. या काळात व्यक्तींचं मानसिक संतुलनदेखील बिघडत असल्याची अनेक उदाहरणं आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या