JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / सासरा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा, अनेकदा बलात्कारही केला; पतीने मात्र...

सासरा चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा, अनेकदा बलात्कारही केला; पतीने मात्र...

या प्रकरणात महिलेने पोलिसात तक्रार केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 2 एप्रिल : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) दमोह जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. प्रकरणात एका महिलेने आपलाच सासरा आणि पतीविरोधात गंभीर आरोप लावले आहेत. सुनेने सासऱ्या विरोधात शारीरिक शोषणअंतर्गत तक्रार दाखल केली आहे. विवाहितेच्या तक्रारीवर पोलिसांनी सासऱ्याला अटक केली. पती सध्या फरार आहे. पोलीस त्याचा तपास करीत आहेत. महिलेने मीडियाला सांगितलं की, 2020 मध्ये तिचं लग्न झालं होतं. सुरुवातीपासूनच 65 वर्षीय सासरे राशिद खान तिच्यावर वाईट नजर ठेवून होते. यामुळे ती नेहमी सासऱ्यापासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र तरीही तो तिचं शारीरिक शोषण करीत होता. सासऱ्याने डोक्याला मलम लावता लावता छेडछाड सुरू केली. ती एकटी असताना तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न करीत होता. सासऱ्याने महिलेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. पती घरी नव्हता, तेव्हा तिच्यावर जबरदस्ती करीत होता. तिने कोणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकीही दिली होती. हे ही वाचा- अल्पवयीन तरुणांचे 6 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार,VIDEO पाहून कुटुंबीय हादरले महिलेने सांगितला धक्कादायक प्रकार… महिलेने सांगितलं की, आरोपी सासऱ्याची साथ तिचा पतीही देत होता. मात्र महिलेला हे आवडत नव्हतं. संतापून महिलेने पोलीस ठाण्यात सासऱ्याविरोधात तक्रार केली. महिलेने पोलिसांना सांगितलं की, जेव्हा पतीला याबाबत सांगितलं तर तो तिच्यावरच संतापला. पती म्हणाला की, तूझी हीच लायकी आहे आणि तुला वडिलांसोबत शरीर संबंध ठेवावे लागतील. संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, पीडित महिलेने पोलिसात येऊन सासऱ्याविरोधात तक्रार केली. तो तिचं शारीरिक शोषण करीत होता. पतीला सांगितलंनंतर त्याने वडिलांचीच साथ दिली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या