JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / पुणे हादरलं! नवरा-बायकोचं भांडण पाहून ओरडली 8 वर्षांची मुलगी, पित्याने केलं भयानक कृत्य

पुणे हादरलं! नवरा-बायकोचं भांडण पाहून ओरडली 8 वर्षांची मुलगी, पित्याने केलं भयानक कृत्य

पांडुरंग उभे असे आरोपीचे नाव आहे. त्याचे वय 38 वर्ष आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 24 सप्टेंबर : पुण्यात घडलेल्या एका घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पती पत्नीचा वाद सुरू असताना एकाने आपल्याच आठ वर्षांच्या मुलीवर गोळी झाडली आहे. कौटुंबिक कलहातून घडलेल्या या या घटनेने शहर हादरलं आहे. पत्नीशी झालेल्या वादानंतर त्याने त्याच्या पत्नीवर रिव्हॉल्व्हर रोखली होती. यावेळी आपल्या आईची अवस्था पाहून मुलीने आरडाओरडा सुरू केल्यावर आरोपीने हे धक्कादायक कृत्य केलं. पांडुरंग उभे असे आरोपीचे नाव आहे. त्याचे वय 38 वर्ष आहे. दरम्यान, बापाच्या या कृत्यानंतर 8 वर्षांची मुलगी गोळी लागल्याने गंभीर जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी शनिवारी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 38 वर्षीय पांडुरंग उभे याच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा ‘बांधकाम’ व्यावसायिक आहे. ही घटना शुक्रवारी घडली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी पांडुरंग उभे हा मद्यधुंद अवस्थेत घरी परतला होता. यानंतर त्याचा त्याची पत्नी आणि इतर कुटुंबीयांशी वाद झाला.

याचवेळी रागाच्या भरात आरोपीने त्याच्याजवळ परवाना असलेले रिव्हॉल्व्हर काढले आणि पत्नीकडे दाखवले. दरम्यान, त्यांची मुलगी राजनंदिनी आरडाओरड करू लागली. त्यानंतर आरोपीने मुलीवर गोळीबार केला. यानंतर मुलीला एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. हेही वाचा -  तोंडामध्ये मिरची कोंबली अन् कपडे फाडले, गुप्तांगावर ओतली दारू, पुण्यातील संतापजनक घटना या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. याबाबत कुटुंबीयांची चौकशी करण्यात येत आहे. मुलीचा जबाबही घेतले जाणार आहे. तपासानंतर आरोपींवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, एका पित्यानेच आपल्या 8 वर्षांच्या मुलीवर गोळी झाडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या