शाकाहारी व्यक्तींसाठी उत्तम ठरतील असे Protein Foods चे पर्याय

फिटनेससाठी Must असलेल्या प्रथिनांचे Veg Options तुलनेने कमी आहेत.

हिवाळ्यात उपलब्ध होणारे मटार हा प्रोटीन्सचा उत्तम स्रोत आहे.

चविष्ट मटारच्या 100 ग्रॅम दाण्यांमध्ये 5.4 ग्रॅम प्रोटीन्स असतात.

कॅलरीजचं प्रमाण अधिक असलं तरी बदाम आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

28 ग्रॅम बदामांमध्ये 6 ग्रॅम प्रोटीन्स आणि 14 ग्रॅम हेल्दी फॅट्स असतात

पोषक तत्त्वं मुबलक असलेल्या सब्जा बियांचं नियमित सेवन फायदेशीर ठरतं.

रात्रीची भूक घटवणाऱ्या सब्जाच्या 28 ग्रॅम बियांत 4 ग्रॅम प्रोटीन्स.

छोल्यांमध्ये प्रोटीन्स, कॅलरीज मुबलक. त्यामुळे सेवन प्रमाणात हवं.

रुचकर छोले फक्त अर्धा कप खाल्ले, तरी 7.25 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.

सहज उपलब्ध होणारे शेंगदाणे उत्तमच; मात्र ते प्रक्रिया केलेले नसावेत. 

चविष्ट असलेल्या 100 ग्रॅम शेंगदाण्यांतून 25 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.

प्रथिनांचा उत्तम स्रोत असल्याने आहारात तूर-मूग-हरभरा आदी डाळी हव्यातच.

हिरव्या/पिवळ्या रंगाच्या अर्धा कप डाळींतून 8-9 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.

पनीरमधूनही खूप प्रथिनं मिळतात. ते कॉटेज चीज नावानंही ओळखलं जातं.

100 ग्रॅम पनीरमध्ये 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन्स असतात.

दह्यापेक्षा जरा वेगळ्या असलेल्या ग्रीक योगर्टमध्ये खूप प्रोटीन्स असतात

100 ग्रॅम योगर्टमधून 10 ग्रॅम प्रोटीन्स, B12, कॅल्शियम आदी घटक मिळतात.

सोयावरी अर्थात Soya Chunks हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे.

50 ग्रॅम Soya Chunksमध्ये तब्बल 25 ग्रॅम प्रोटीन्स असतात.

सोयाचंक एस्ट्रोजेनवर परिणामकारक असल्याने पुरुषांनी कमी खावेत. 

टोफू सोयाबीनपासून करत असल्याने त्याला सोया पनीर म्हणतात.

फ्लेवर्ड टोफू खाण्याऐवजी साधं टोफू खाल्ल्यास प्रकृतीला जास्त उपयुक्त.

पनीरला पर्याय असलेल्या 100 ग्रॅम टोफूतून 10-12 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?