JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / घरगुती वादाचे रुपांतर भयानक घटनेत, आधी पतीने केली आत्महत्या तर नंतर पत्नीनेही...

घरगुती वादाचे रुपांतर भयानक घटनेत, आधी पतीने केली आत्महत्या तर नंतर पत्नीनेही...

पती आणि पत्नीने धक्कादायक निर्णय घेतला.

जाहिरात

पती आणि पत्नी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रियांक सौरव, प्रतिनिधी मुजफ्फरपुर, 14 जुलै : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अनैतिक संबंधातून आत्महत्या, हत्या तसेच बलात्काराच्याही संतापजनक घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादाचे रुपांतर अत्यंत धक्कादायक घटनेत झाले. पती आणि पत्नी दोघांनी आत्महत्ये केल्याच्या या घटनेने परिसर सुन्न झाला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पती आणि पत्नीने आत्महत्या केल्याची ही घटना बिहार राज्यातील मुजफ्फरपुरच्या फरदो पुल जवळ घडली. सकाळच्या सुमारात पती आणि पत्नीचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. यानंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, हे मृतदेह खाली उतरवण्यात आले. यानंतर त्यांना शवविच्छेदनासाठी SKMCH पाठवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, लालू छपरा येथील विक्रम कुमार सिंह आणि त्यांची पत्नी शबनम सिंह आपल्या 4 वर्षांच्या मुलासह राहत होते. दोन्ही पती पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे. असे सांगितले जात आहे की, कुठल्यातरी विषयावरुन मंगळवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला होता. यामुळे पतीने गळफास घेत आत्महत्या केली. पतीने आत्महत्या केल्यावर पत्नीनेही लगेच गळफास घेत आपले जीवन संपवले. दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. तर घटनास्थळावरुन दुपट्टा जप्त केला असून याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोज कुमार यांनी दिली. दरम्यान, पती पत्नीच्या आत्महत्येच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या