JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Fake Currency : नकली नोटांची क्वालिटी अशी सुधारली, पोलीसही झाले हैराण, दोघांना अटक

Fake Currency : नकली नोटांची क्वालिटी अशी सुधारली, पोलीसही झाले हैराण, दोघांना अटक

शाहिद कपूरची वेब-सीरिज फर्जीचं मागच्या काही महिन्यांमध्ये कौतुक झालं आहे. यामध्ये दोन युवकांनी उत्कृष्ट क्वालिटीच्या भारतीय नकली नोटा स्वत:च्याच प्रिटिंग प्रेसमध्ये छापल्या. असाच काहीसा प्रकार सत्यामध्येही उतरला आहे.

जाहिरात

नकली नोटांची क्वालिटी केली चांगली, पोलीसही चक्रावले

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अंशुल सिंग, प्रतिनिधी नवी दिल्ली, 27 जून : शाहिद कपूरची वेब-सीरिज फर्जीचं मागच्या काही महिन्यांमध्ये कौतुक झालं आहे. यामध्ये दोन युवकांनी उत्कृष्ट क्वालिटीच्या भारतीय नकली नोटा स्वत:च्याच प्रिटिंग प्रेसमध्ये छापल्या. असाच काहीसा प्रकार सत्यामध्येही उतरला आहे. या वेब-सीरिज प्रमाणेच नकली नोटा छापणाऱ्या उत्तर प्रदेशच्या युवकाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीचं नाव इरशाद असून पोलिसांनी त्याच्याकडून अडीच लाख रुपयांच्या 2 हजारांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत. कोरोना काळामध्ये प्रचंड नुकसान झालं होतं. रोजच्या जेवणाची सोय करणंही कठीण जात होतं. यश मिळत नसल्यामुळे आपण नकली नोटा छापायला सुरूवात केली, असं इरशादने पोलीस तपासात सांगितलं आहे. इरशाद निरक्षर आहे, त्याने औपचारिक शिक्षणही घेतलेलं नाही. नकली नोटांची जास्त मागणी आणि प्रॉफिट मार्जिन पाहून तो या धंद्यात आला. आपल्या एका मित्राच्या मदतीने इरशादने आपल्याच दुकानात प्रिंटरच्या मदतीने नोटा छापायला लागला. या नकली नोटांचा सप्लाय तो दिल्ली-एनसीआरमध्ये करायचा. इरशादने शिक्षण घेतलेलं नसलं तरी त्याने नकली नोट छापण्याआधी बराच रिसर्च केला होता. योग्य क्वालिटीच्या पेपरचा वापर यासाठी केला गेला. ऑनलाईन रिसर्च केल्यानंतर त्याने योग्य इंकचीही सोय केली. त्याचा एक सहकारी वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रिटिंगशी जोडल्या गेलेल्या डायरचं काम करायचा. आपल्या कनेक्शनचा वापर करत तो फेक बिलच्या माध्यमातून पेपर तसंच इतर गोष्टींची सोय करायचा. दिल्लीच्या अलिपूर भागामध्ये फेक नोटा सप्लाय करण्यासाठी कुणीतरी येणार आहे, याची खबर पोलिसांना लागली. यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली. आरोपीने उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातल्या कैरानामध्ये राहणाऱ्या इरशादकडून नोटा घेतल्याचं सांगितलं, यानंतर इरशादलाही अटक करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या