धौलपूर, 14 ऑगस्ट : राजस्थानच्या धौलपूरमध्ये फेसबुक फ्रेंडवर बलात्कार करून तिला धमकावल्याची घटना समोर आली आहे. पंजाबमधील रहिवासी असलेल्या पीडित तरुणीला आरोपी तरुणाने नोकरीच्या बहाण्याने धौलपूर येथे बोलावले आणि नंतर जबरदस्तीने शहरातील एका हॉटेलमध्ये प्रवेश नेत तरुणीवर बलात्कार केला. तसेच बलात्कारानंतर आरोपीने मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिला एकटीला सोडून पळ काढला. काय आहे संपूर्ण प्रकरण - याप्रकरणी पीडित तरुणीने महिला पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने सांगितले की, ‘तिची धौलपूर शहरातील एका तरुणाशी फेसबुकवर मैत्री होती. मैत्रीदरम्यान दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबरही शेअर केले होते. या मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तिला नोकरीची नितांत गरज होती. तरुणीला बोलण्यात अडकवून आरोपी तरुणाने 10 ऑगस्ट 2022 रोजी नोकरी लावण्याच्या बहाण्याने त्याला धौलपूर शहरात बोलावले. यानंतर आरोपीने या तरुणीला शहरातील एका हॉटेलमध्ये नेत तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. पीडितेने विरोध केला असता त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. बलात्कार केल्यानंतर आरोपी मुलीला सोडून पळून गेला. यानंतर याप्रकरणी तरुणीने महिला पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा - स्कूल बसचालकाचा तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत बलात्कार, विद्यार्थिनी झाली गर्भवती अन् या घटनेबाबत एसएचओ मंजू फौजदार यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीची वैद्यकीय चाचणीही जिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. पोलिसांनीही घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.