मुंबई, 24 फेब्रुवारी : मुंबईतील (Mumbai) 49 गुन्ह्यांत वाॅन्टेंड असलेल्या कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारीला (gangster Ravi Pujari) मुंबई मोक्का न्यायालयाने 15 दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाच्या परवानगीने कर्नाटक जेलमधून मुंबई पोलिसांनी रवी पुजारीला मुंबईत आणले. कर्नाटक ते मुबंई असा 18 तासांचा प्रवास करत सुरक्षेच्या गराड्यात रवी पुजारीला मुंबईत आणण्यात आले. रवी पुजारीची मुंबई पोलिसांना कोठडी मिळाल्याने अनेक राजकीय नेते, पोलिस, सेलिब्रिटी आणि उद्योगपतींना घाम फुटू लागला आहे. कारण अनेकजण थेट रवी पुजारीच्या संपर्कात होते. कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारी परदेशात बसून अनेक राजकीय नेते, पोलीस, सेलिब्रिटी आणि उद्योगपतींना खंडणी करता धमकी द्यायचा आणि एका पत्रकाराने त्याला चिंधी अशी उपमा दिल्याने त्या पत्रकाराच्या हत्येची सुपारी देणारा हाच तो रवी पुजारी. पण अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आले. विलेपार्ले येथील एका गोळीबार प्रकरणात रवी पुजारीला मुंबई मोक्का न्यायालयाने 15 दिवसांची पोलrस कोठडी सुनावली. सारा अली खान आणि विजय देवरकोंडा बॉलिवूडमधलं नवं जोडपं? पुन्हा दिसले एकत्र गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच रवी पुजारीला आफ्रिका खंडातील सेनेगल येथून त्याला अटक करण्यात आली होती. रवी पुजारी हा अँथोनी फर्नांडिस या नावाने वावरत होता. सेनेगलमधील तपास यंत्रणांच्या लेखी दस्तावेजात याच नावाची नोंद आहे. त्यावेळेस बुर्किना फासो या देशाचा पासपोर्ट रवी पुजारीकडून जप्त केला होता मलेशिया, मोरोक्को आणि थायलंड, पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो, कोंगो रीपब्लिक, गिनी, आयव्हरी कोस्ट आणि सेनेगल या देशांत सतत रवी पुजारी ठिकाण बदलून राहत होता. एवढंच नाही तर खंडणी उकळून मिळालेल्या पैशांतून रवी पुजारीने “नमस्ते इंडिया या नावाने अनेक मोठे रेस्टोरंट सुरू केले होते. तर सेनेगलची राजधानी डकारमधील श्रीमंतांपैकी एक अशी ओळख रवी पुजारीची झाली होती. रवी पुजारीवर सतत भारतीय गुप्तचर यंत्रणांची नजर होतीच यामुळे वेळ मिळताच सापळा लावून रवी पुजारी याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. McDonald मध्ये ‘हॅप्पी मिल’ खाण पडलं महागात; भरावा लागला 2 लाखांचा दंड अँथोनी फर्नांडिस हे नाव बदलून रवी पुजारी गेली ८-१० वर्षे आफ्रिकेतील सेनेगल मधील डकार मध्ये राहत होता. गेल्या वर्षी अटक झाल्यावर फरार झालेला रवी पुजारी पुन्हा आपली संपत्ती आणि परिवाराला घेऊन जाण्यास डकारमध्ये आला होता. पण हा भारतीय गुप्तचर यंत्रणांचा सापळा होता ज्यात रवी पुजारी सहज अडकला. रवी पुजारीवर भारतात 250 पेक्षा जास्त गुन्हे दाखल - कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरातमध्ये सर्वाधिक गुन्हे रवी पुजारीवर आहेत - कर्नाटक राज्यांत बंगळूरूमध्ये ३९ गुन्हे, मंगळूरमध्ये ३६, उडुपीमध्ये ११ तर म्हैसूर, हुबळी-धारवाड, कोलार आणि शिवमोगामध्ये प्रत्येकी एक गुन्हा पुजारीविरुद्ध दाखल आहे. - महाराष्ट्र मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये पुजारीविरुद्ध ४९ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यातील २६ गुन्हे मकोकाखाली दाखल झाले - गुजरातमध्ये त्याच्याविरुद्ध खंडणी प्रकरणी ७५ गुन्ह्यांची नोंद आहे. बिल्डर ओमप्रकाश कुकरेजाचा खून - 2013 बिल्डर सुधाकर शेट्टी यांच्या दोन कर्मचार्यांची हत्या - चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यावर खुनाची बोली - नवी मुंबईचा बिल्डर सुरेश वाधवा, वकील मजीद मेमन यांच्यावर हल्ला केला होता - JNU मोर्चेक-यांना धमकी दिली - हुरीयतचे सय्यद अली शाह यांना धमकी दिली - केरळचे आमदार पी सी जॉर्ज यांच्या मुलांना मारण्याची धमकी दिली - 2009 ते 2013 ये दरम्यान रवी पुजारीने खंडणी करता तसंच विविध कारणांवरुन सलमान खान, अक्षय कुमार, करन जोहर, राकेश रोशन, शाहरुख खान यांना धमकावले होते. खरंतर रवी पुजारीवर दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांच्या खटल्यात आरोपींना शिक्षा झाली आहे तसंच काही प्रकरणे अंतिम टप्प्यात आहेत. पण रवी पुजारीच्या अटकेने अनेक राजकीय नेते, पोलीस, सेलिब्रिटी आणि उद्योगपतींना घाम फुटू लागला आहे, कारण अनेकजण थेट रवी पुजारीच्या संपर्कात होते. जे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या रवी पुजारीला मदत करायचे. ज्यामुळे येत्या काही दिवसांत रवी पुजारीच्या चौकशीत मोठे खुलासे होतील हे नक्की.