मध्य प्रदेश, 29 ऑगस्ट : इंदूरमधील (Madhya Pradesh) छावणी भागात राहणाऱ्या एका जिम ट्रेनरने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचं वृत्त समोर आलं आहे. जेव्हा तरुणाचा भाऊ खोलीत शूज घालण्यासाठी पोहोचला तेव्हा जिम ट्रेनर खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. ट्रेनरच्या खोलीत एक सुसाइड नोट मिळाली आहे. त्यात लिहिलं आहे की, दोन्ही चुलत बहिणींना माझा चेहरा दाखवू नका. प्रेयसीलादेखील अंत्यसंस्कारात सामील करू नका. जर माझी ही शेवटची इच्छा पूर्ण झाली नाही तर माझी आत्मा भटकत राहील. (Dont show my face to cousins not even girlfriend, Terms of the funeral written by the young man in the suicide note) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचं नाव विनोद वर्मा आहे. विनोद हा जिम ट्रेनरचं काम करीत होता. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह भाऊ नितेशने गळफास घेतला होता. यानंतर तो त्याला रुग्णालयात घेऊन पोहोचला होता. लॉकडाऊनमुळे काही वेळापूर्वी गोपाळने काम सोडलं होतं. तपासानंतर समोर आलेल्या बातमीनुसार, कुटुंबात वाद सुरू होता. यामध्ये तो चुलत बहिणींवर निराश झाला होता. पोलिसांनी सुसाइड नोट ताब्यात घेतली आहे. गोपाळच्या घरात त्याचे आई-वडील आणि दोन भाऊदेखील आहेत. हे ही वाचा- घरातील मोठ्या सुनेने सासरच्या मंडळींसाठी केला चहा;एकाचा मृत्यू, 5 जणं रुग्णालयात आपल्या मनाने करतोय सुसाइड गोपाळने सुसाइड नोटमध्ये स्वत:च्या इच्छेने आत्महत्या करीत असल्याचं सांगितलं आहे. त्याने लिहिलं आहे की, तो जे काही करीत आहे ते आनंदाने करीत आहे. मृत व्यक्तीचा भाऊ अंकुशने सांगितलं की, गोलू आणि मन्नू त्यांच्या सख्खा बहिणी नाहीत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या कुटुंबात वाद सुरू आहे. या वादात त्याच्या दोन्ही चुलत बहिणी हस्तक्षेप करीत होती. या कारणामुळेच गोपाळने सुसाइड नोटमध्ये असं काहीसं लिहिलं होतं