JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Dhule Murder : पोरगं दारू पिऊन वाया गेलं, घरच्यांनाच मारायचं, आई कंटाळली अन् दिली सुपारी, पुढे जे घडलं...

Dhule Murder : पोरगं दारू पिऊन वाया गेलं, घरच्यांनाच मारायचं, आई कंटाळली अन् दिली सुपारी, पुढे जे घडलं...

ळ्यात मागच्या दोन दिवसांपूर्वी एक युवकाचा खून झाला होता. याप्रकरणी धुळे तालुक्यात जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान या युवकाच्या खुनाचा उलगडा झाला आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

धुळे, 03 डिसेंबर : धुळ्यात मागच्या दोन दिवसांपूर्वी एक युवकाचा खून झाला होता. याप्रकरणी धुळे तालुक्यात जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान या युवकाच्या खुनाचा उलगडा झाला आहे. धुळे तालुक्यातील मेहगाव येथील युवकाच्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. मेहरगाव येथील अमोल विश्वास भामरे या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी तपासात तरुणाच्या खुनासाठी त्याच्या सख्या आईनेच सुपारी दिल्याची बाब समोर आली आहे. मुलगा दारू पिऊन सर्व परिवाराला छळत असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे.

काल धुळे पोलिसांना मृतदेह संशयास्पद परिस्थितीत मिळून आल्याने पोलिसांना याबाबत संशय आला होता. यामुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक पाटील यांनी तपासाला चालना देत. सगळ्या दृष्टीने विचार करत या प्रकरणातून धक्कादायक प्रकार समोर आणला आहे.

हे ही वाचा :  नराधम पित्याचा आपल्याच मुलीवर बलात्कार; पीडितेने ऐनवेळी जबाब बदलला, तरीही ‘या’ एका कारणामुळे झाली 20 वर्षांची शिक्षा

संबंधित बातम्या

या खूनाचा उलगडा झाल्यामुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत तपासाची माहिती दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप महिराळे यांच्यासह तपास पथकाची उपस्थिती होती. मयत अमोल भामरे हा खाजगी गाडी चालवण्याचे काम करत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून तो एका असाध्य आजाराने पीडित असल्यामुळे तो मद्याच्या आहारी गेला होता. दारुच्या नशेत त्याने सर्व परिवाराला वेठीस धरण्याचे काम सुरू केले होते.

जाहिरात

याबरोबरच मयत अमोलने सुरत येथे राहणाऱ्या त्याच्या मेव्हण्याला देखील व्यसनाधीन केल्याची माहिती आहे.. त्यामुळे मेव्हण्याचाही परिवार उद्धस्त झाला होता. मयत अमोल भामरे याने अनेक गुन्हे केल्याने त्याच्यावर अटक होण्याची वेळ आली होती. यामुळे त्याच्या जामिनासाठी कुटुंबियांना खर्च करून धावपळ करावी लागत होती.

अमोल नशेत घरी येऊन कुटुंबियांवर मारहाण करायचा यातून त्यांने कित्येकांवर प्राणघातक हल्ले केले आहेत. त्यामुळे त्याच्याकडून त्याच्या पूर्ण परिवाराला धोका होण्याच्या भितीतून त्याच्या सख्या आईनेच त्याला संपवण्यासाठी गावातील चौघांबरोबर संपर्क केला. या चौघांना 25 हजारांची सुपारी देऊन त्यांनी अमोल भामरे याला रस्त्यातून साफ करण्याचा कट केला.

जाहिरात

हे ही वाचा :  आई-वडिलांच्या आत्महत्येमुळे हादरली; बदला घेण्यासाठी तरुणीने क्राईम शो पाहिला अन् केलं भयानक कांड

मात्र ही बाब पोलीस तपासात निदर्शनास आल्याने पोलीस पथकाने मयताची आई लताबाई विश्वास भामरे, तसेच खून करणारा पुंडलिक गिरधर भामरे या दोघांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे अन्य दोघा मारेकऱ्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि सोनगीर पोलीस ठाण्याचे दोन पथक रवाना करण्यात आले आहेत.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या