JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / ज्याच्यावर प्रेम केलं त्यानेच घोटला गळा, दुसऱ्या गर्लफ्रेंडशी लग्न करण्यासाठी Live-in पार्टनरकडून तरुणीची हत्या

ज्याच्यावर प्रेम केलं त्यानेच घोटला गळा, दुसऱ्या गर्लफ्रेंडशी लग्न करण्यासाठी Live-in पार्टनरकडून तरुणीची हत्या

दुसऱ्या एका मुलीशी लग्न करण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या (Delhi Live-in partner murdered) केल्याचा प्रकार उडकीस आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट: दुसऱ्या एका मुलीशी लग्न करण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या (Delhi Live-in partner murdered) केल्याचा प्रकार उडकीस आला आहे. दिल्लीच्या राजपूर खुर्दमध्ये (Delhi Rajpur Khurd murder) ही घटना घडली आहे. 08 ऑगस्ट 2021ला सायंकाळी ही हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत, आरोपी आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. 08 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पोलिसांना एका व्यक्तीने फोन केला होता. राजपूर खुर्द गावामागे असणाऱ्या जंगलात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून (Rajpur Khurd jungle murder) आल्याची माहिती या व्यक्तीने दिली होती. प्राथमिक तपासात ओढणीने गळा आवळून या महिलेची हत्या (Woman strangled to death) करण्यात आल्याचे दिसून येत होते. फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले, की तो दारू पिण्यासाठी म्हणून जंगलात आला होता. यावेळी त्याने पाहिले, की दोन व्यक्ती एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर या महिलेला (live-in partner killed) जंगलात घेऊन आले, आणि तिची हत्या केली. यानंतर माहिती देणारा दारुडा घाबरुन घरी पळून गेला, आणि मग पोलिसांना फोन करुन त्याने झालेल्या प्रकाराची माहिती दिली. एनडीटीव्ही इंडियाने याबाबत वृत्त दिलं आहे. हे वाचा- आधी डोळे काढले, मग..; बापानंच केली 8 वर्षीय मुलीची हत्या, कारण ऐकून बसेल धक्का या माहितीच्या आधारे पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले. तसेच, अधिक माहितीसाठी त्यांनी फोन करणाऱ्याची चौकशी केली. यावेळी त्याने दिलेल्या माहितीमध्ये विरोधाभास दिसून आल्यामुळे पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला, आणि त्याची कसून चौकशी केली. यानंतर त्याने सांगितले, की तो मृत तरुणीला ओळखत होता. फतेहपूर बेरी परिसरात राहणारा त्याचा मित्र अनुजची ती पत्नी किंवा लिव्ह इन पार्टनर (Woman killed by live-in partner) आहे. अनुजने आपल्या आणखी एका मित्रासोबत मिळून तरुणीची हत्या (live-in partner killed with help of friends) केल्याचे या व्यक्तीने सांगितले. यानंतर तातडीने तपास करत पोलिसांनी अनुजला अटक केली. त्यासोबतच त्याचा साथीदार नौशादही पकडला गेला. या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी हत्येची कबुली दिली. अनुज आणि मृत तरुणीची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. पुढे अनुजने आपला मित्र रमजानच्या मदतीने तरुणीला पळवून नेले होते. त्यानंतर त्यांनी मंदिरातच लग्न उरकून एकत्र राहण्यास सुरुवात केली होती. आरोपी अनुजचे दुसऱ्या एका मुलीसोबतही संबंध (live in partner killed) होते. ती मुलगी आता लग्नासाठी अनुजच्या मागे लागली होती. दोन दिवसांपूर्वी अनुज या दुसऱ्या मुलीला घेऊन पळूनही गेला होता, मात्र तिच्या कुटुंबीयांनी यांना पकडले होते. या मुलीसोबत लग्न करण्यासाठी पहिल्या तरुणीला आयुष्यातून बाजूला करणं गरजेचं होतं. त्यामुळे अनुजने नौशाद आणि रमजानसोबत मिळून तिच्या हत्येचा कट रचला. हे वाचा- भाजप नेते आणि त्यांच्या पत्नीची गोळी घालून हत्या; दहशतवादी हल्ल्यानंतर खळबळ ठरल्याप्रमाणे रमजान आधीच जंगलात थांबला होता. अनुज आणि नौशाद या तरुणीला जंगलात घेऊन गेले. या ठिकाणी तिची ओढणीने गळा आवळून हत्या करण्यात आली. पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे, तसेच यात वापरण्यात आलेली दुचाकीही जप्त केली आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या