JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / मेहुण्याच्या मृतदेहाचे 31 तुकडे केले, म्हणून आरोपीला दिली थरकाप उडवणारी शिक्षा

मेहुण्याच्या मृतदेहाचे 31 तुकडे केले, म्हणून आरोपीला दिली थरकाप उडवणारी शिक्षा

या घटनेनंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बुलंदशहर, 12 मे : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) गुलावठीमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेल्या शादाब हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात खुलासा करीत सांगितलं की, हत्यांकाडाचे मुख्य आरोपी कासिफने आपला मेव्हणा इरफानच्या मृत्यूचा (Crime News) सूड उगवण्यासाठी भयंकर कृत्य केलं. यासाठी त्याने दिल्लीतून भाड्याने शूटर्स बोलावले. पोलिसांनी सांगितलं की, शादाब आणि आरोपीमध्ये शत्रूत्व होतं. गेल्या 18 मार्च रोजी हापुड निवासी इरफान नावाच्या व्यक्तीची हत्या केली होती आणि मारेकऱ्याने त्याचे 31 तुकडे केले होते. इरफानच्या हत्या प्रकरणात शादाबचा भाऊ डासना तुरुंगात आहे. इरफानच्या हत्येनंतर त्याचा मेव्हणा कासिफ आणि भाऊ बदल घेण्याच्या तयारीत होते. इरफानचा मेहुणा कासिफने दिल्लीतील भाड्याने घेतलेले 3 शार्प शूटर आणि अन्य एकासोबत मिळून गुलावतीमध्ये शादाब हत्येचे भयंकर कृत्य केलं. यादरम्यान शूटर्स आणि कासिफने शादाबला 31 गोळ्या घातल्या. गोळीबार करताना कोणाला गोळ्या घालत असल्याचं आरोपींचा लक्षातही नव्हतं. त्यांनी आपल्याच एका साथीदाराला गोळी घालून जखमी केलं. आता पोलिसांनी शूटर्सला अटक करीत घटनेत वापरलेले पिस्तूल, कारतूसं, दुचाकी आदी जप्त केले आहेत. दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी बुलंदशहर भागातील गुलावठीमधील डॉक्टर शादाबची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी भाड्याने आणलेल्या शूटर्सना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या