JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / धक्कादायक! थोडं हलक्यात घेतल्यासारखं नाही ना वाटत, असं जीव देतं का कोण?

धक्कादायक! थोडं हलक्यात घेतल्यासारखं नाही ना वाटत, असं जीव देतं का कोण?

तरुणाने सिलिंडरला पाईप जोडला आणि पाईप पॉलिथिन बॅगला जोडून चेहरा पॉलिथिनने पूर्णपणे झाकून घेतला. यामुळे धक्कादायकरित्या मृत्यू झाला

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 23 मार्च :  देशाची राजधानी दिल्लीतील आदर्श नगरमधील एका हॉटेलमध्ये एका 24 वर्षीय तरुणाने भयानक पद्धतीने आत्महत्या केली आहे. दरम्यान पोलिसांना घटनास्थळावरून एक चिठ्ठीही मिळाली आहे. यामध्ये तरुणाने जीव देण्यामागचे कारणही सांगितले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नितेश नावाच्या या तरुणाने काल दुपारी आदर्श नगर येथील अभिषेक हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. सोबत एक छोटी बॅग घेऊन तो खोलीत पोहोचला. त्या पिशवीत एक छोटासा ऑक्सिजन सिलेंडर होता. तरुणाने सिलिंडरला पाईप जोडला आणि पाईप पॉलिथिन बॅगला जोडून चेहरा पॉलिथिनने पूर्णपणे झाकून घेतला. त्यानंतर त्याने सिलिंडर चालू केला आणि त्यामुळे जास्त प्रमाणात ऑक्सिजन घेतल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

याचबरोबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीकडून एक चिठ्ठी सापडली आहे. त्या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, त्यांच्या आजारपणामुळे मी खूप त्रस्त आहे. आत्महत्या करण्याची ही ही पद्धत इंटरनेटवरून शिकली आहे. यासाठी मी अनेक व्हिडिओ देखील पाहिले आहेत. अशा प्रकारे मरताना कमी वेदना होतील असे सांगण्यात आल्याने हे पाऊल उचलत असल्याचे त्या तरूणाने सांगितले आहे.

संबंधित बातम्या

त्याच्या आजारपणामुळे तो खूप व्यथित झाला असून त्याने आत्महत्या केल्यास त्याच्या उपचारासाठी त्याच्या आई-वडिलांचा खर्चही संपणार असल्याचे त्या पत्रात असल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक हा गार्डचे काम करायचा.  

तो दिल्लीतील मुखर्जी नगर परिसरात कुटुंबासह रहायचा. तो नोकरी आणि आरोग्याच्या समस्यामुळे त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. यातून त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या