JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / लग्‍नाची मिरवणूक निघणार तेवढ्यात धक्कादायक माहिती समजली आणि…

लग्‍नाची मिरवणूक निघणार तेवढ्यात धक्कादायक माहिती समजली आणि…

छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 02 मे रोजी बोहल्यावर चढणाऱ्या व्यक्तीने अचानक टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखेश्वर यादव (जंजगीर चंपा), 05 मे : छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 02 मे रोजी बोहल्यावर चढणाऱ्या व्यक्तीने अचानक टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. गजाधर विश्वकर्मा या 27 वर्षीय तरूणाने गावात तलावाच्या काठावरील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेनंतर घरातील असलेले आनंदाचे वातावरण अचानक शोकसागरात बुडाले आहे.

छत्तीसगडमधील भोटीडीह गावात राहणाऱ्या 27 वर्षीय गजाधर विश्वकर्मा यांचा विवाह 2 मे रोजी होणार होता. यामुळे लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. गजाधर यांच्या घरी हळदी खेळून मुलीच्या घरी जाण्यासाठी तयारी सुरू होती. दरम्यान, नवरा मुलगा अचानक काही कामाच्या निमीत्त सांगून घराबाहेर गेला. परंतु तो परत आलाच नाही.

नवरीसोबत रूममध्ये गेला अन् तिथेच भयानक घडलं; लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू

संबंधित बातम्या

काही वेळाने लग्नाची मिरवणूक काढण्याच्या विधीसाठी नातेवाईक तरूणाला बोलावण्यासाठी गेले असता तो गायब असल्याचे समजलं. त्यानंतर कुटुंबीय व ग्रामस्थांनी गावात त्याचा शोध सुरू केला. शोध सुरू असताना तलावाच्या काठावरील झाडाला तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

आपल्या मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला. नातेवाइकांनीही या घटनेची माहिती वधूच्या घरी दिली तर ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून वराचा मृतदेह खाली उतरवला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

जाहिरात

दरम्यान गजाधर विश्वकर्मा यांच्या बहिणीचेही बुधवारी 03 मे रोजी लग्न होते. गजाधर विश्वकर्मा हा गुजरातमधील भुज येथील एका कंपनीत कामाला होता. लग्नासाठी तो घरी आला होता. पोलीस कुटुंबीयांची चौकशी करून आत्महत्येचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अचानक काय झाले, लग्नाच्या दिवशीच वराने असे पाऊल का उचलले, हे घरातील सदस्यांनाही काही सांगता येत नाही.

जाहिरात
हे तर अजबच! डावीकडे नाही तर उजव्या बाजूला धडकतं या महिलेचं हृदय

याचबरोबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मृत व्यक्तीकडून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. अशा परिस्थितीत कुटुंबीयांनाही आत्महत्येचे कारण सांगता येत नाही. पोलिस त्याच्या गुजरातस्थित कंपनीशीही संपर्क साधत आहेत. यासोबतच त्याच्या मित्रांचीही चौकशी सुरू आहे. तसेच मृताच्या मोबाईलवरील कॉल डिटेल्स आणि मेसेजवरून आत्महत्येचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या