JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / Crime News : अल्पवयीन मुलीवर बहिणीचा नवरा आणि मित्राकडून अत्याचार, पॉक्सो कायद्या अंतर्गत मिळाली शिक्षा

Crime News : अल्पवयीन मुलीवर बहिणीचा नवरा आणि मित्राकडून अत्याचार, पॉक्सो कायद्या अंतर्गत मिळाली शिक्षा

एका 13 वर्षीय मुलीवर तिच्या बहिणीचा पती आणि त्याच्या मित्रांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या गुन्ह्यासाठी पॉक्सो स्पेशल कोर्टने मुलीवर बलात्कार करणाऱ्या बहिणीच्या पतीला आणि त्याच्या मित्रांना 25 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

जाहिरात

अल्पवयीन मुलीवर बहिणीचा नवरा आणि मित्राकडून अत्याचार, पॉक्सो कायद्या अंतर्गत मिळाली शिक्षा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बोकारो, 10 जून : झारखंडच्या बोकारो येथे माणुसकीला काळिंबा फासणारी घटना समोर आली आहे. एका 13 वर्षीय मुलीवर तिच्या बहिणीचा पती आणि त्याच्या मित्रांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या गुन्ह्यासाठी पॉक्सो स्पेशल कोर्टने मुलीवर बलात्कार करणाऱ्या बहिणीच्या पतीला आणि त्याच्या मित्रांना 25 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोन्ही दोषींना 10 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. तसेच दंड न दिल्यास दोघांना सहा महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल. सरकारच्या वतीने कोर्टात फिर्यादीचे प्रतिनिधित्व करणारे विशेष सरकारी वकील वीरेंद्र कुमार यांनी ही माहिती दिली. संबंधित घटना 2021 ची असून यात 13 वर्षीय मुलीच्या बहिणीचा पती हा अनेकदा त्याच्या सासरी यायचा. यावेळी त्याने त्याच्या अल्पवयीन मेहुणीला धमकावत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यासोबतच शेजारी राहणाऱ्या बहिणीच्या पतीच्या मित्राला याबाबत माहिती झाल्यास त्याने देखील अल्पवयीन मुलीला धमकावून ब्लॅकमेल करत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. दोघांच्या भीतीमुळे मुलीने तिच्या सोबत झालेल्या बलात्काराचा उल्लेख कोणा समोर देखील केला नाही. 3 लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, त्यानेही फसवलं मग पोलीस स्टेशन गाठलं अल्ट्रासाऊंडमधून गर्भधारणेची मिळाली माहिती : वारंवार बलात्कार होत असल्याने मुलगी गरोदर राहिली. त्यामुळे तिच्या पोटात दुखण्यासोबतच शरीरात बदलही होऊ लागले. पोट फुगून तिला पोटात दुखत असल्याने तिचे कुटुंबीय तिला वसाहतीतील महिला डॉक्टरांकडे घेऊन गेले, तेथे अल्ट्रासाऊंड केल्यानंतर मुलगी गरोदर असल्याचे आढळून आले. कुटुंबीयांसाठी ही माहिती धक्कादायक होती.

2021 रोजी गुन्ह्याची झाली नोंद : माहिती मिळताच नातेवाईकांनी मुलीची चौकशी सुरू केली, त्यानंतर आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीला शहर पोलीस ठाण्यात नेले, जिथे 11 सप्टेंबर 2021 रोजी पीडितेच्या वडिलांच्या लेखी तक्रारीवरून दोन्ही दोषींविरुद्ध POCSO कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या