मुंबई 12 सप्टेंबर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचे नग्न फोटो काढत ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका 20 वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आली होती. या तरुणाला विशेष पोस्को न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हा तरुण 5 महिन्यांपासून कारागृहात होता. दरम्यान, रिलेशनशिपमध्ये असताना नग्न फोटो काढणं, याचा अर्थ या दोघांमध्ये सहमतीने संबंध होते, असं निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या बाबत वृत्त दिलंय. 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 20 वर्षीय तरुणाला विशेष पोक्सो न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बलात्कार करुन संबंधित मुलीचे नग्न फोटो काढणं, आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप या तरुणावर आहे. या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली होती आणि हा तरुण गेल्या 5 महिन्यांपासून कारागृहात होता. आरोपीने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असता त्यावर सुनावणी झाली असून तरुणाला जामीन मंजूर झाला आहे. आरोपीने न्यायालयात सांगितलं की, ‘हे संबंध सहमतीने होते, पण मुलीच्या कुटुंबियांचा या नात्याला विरोध होता.’ हत्या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शीचा कोरोनाने मृत्यू! संशयित आरोपीबाबत कोर्टाने घेतला मोठा निर्णय दुसरीकडे, पोस्को न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. न्यायालयाने म्हटलं की, हे ‘प्रेमसंबंध’ असल्यासारखं वाटत असून मुलगी पुरेशी परिपक्व आहे. पीडित आणि आरोपी दोघंही प्रेमसंबंधात होते. रेकॉर्डवर पाहिल्यावर असं दिसतं की, तिचे आरोपीसोबत शारीरिक संबंध होते. याशिवाय याप्रकरणी आता दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झालं आहे. या प्रकरणाचा पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे, त्यामुळे आरोपीची पुढील कोठडी देणं अवाजवी आहे. तसंच न्यायालयाने आरोपीला जामीनदेखील मंजूर केला आहे. पोलीस आणि कुटुंबीयांनी अडीच महिने घेतला बेपत्ता तरुणाचा शोध, अखेर घरातच सापडला पुरलेला मृतदेह नेमकं प्रकरण काय? जानेवारी 2021 मध्ये आरोपीने मुलीला एका लॉजमध्ये नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. आरोपीने पीडित मुलीचे नग्न फोटोही काढले. त्यानंतर मुलगी त्याच्याशी संबंध ठेवण्यास तयार नव्हती, अशी माहितीही देण्यात आली. तर, फिर्यादीने सांगितलं की, ‘मुलगी अल्पवयीन असल्याचं माहीत असूनही आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले तसंच नग्न फोटो आणि व्हिडिओ डिलिट करण्यासाठी 26 हजार रुपयांची मागणी केली.’ या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो जवळपास 5 महिने कारागृहात होता. आता त्याला जामीन मंजूर झाला आहे. तसंच आरोपीच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्रसुद्धा दाखल झालं आहे.