JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / खोकल्याचं औषध घेऊन झोपी गेलं दाम्पत्य; काही तासात महिलेचा मृत्यू, गावात खळबळ

खोकल्याचं औषध घेऊन झोपी गेलं दाम्पत्य; काही तासात महिलेचा मृत्यू, गावात खळबळ

महिलेचा मृत्यू झाला असून पती गंभीर आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंदीगड, 13 जानेवारी : हरियाणाताली (Haryana News) सोनीपतमधील गावात एका महिलेचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर त्यांना जवळील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, येथे डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. तर दुसरीकडे तिचा पती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. मृत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसांना सांगितलं की, तिला खोकला सुरू होता, म्हणून तिने खोकल्याचं औषध घेतलं. यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागलं आणि यातच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमार्टम केल्यानंतर कुटुंबीयांकडे सोपवला. रुग्णालयातच मृत्यू.. सोनीपतजवळील एका गावात अश्विन (33) आणि पत्नी प्रीती (30) ने बुधवारी खोकल्याचं औषध समजून विषारी पदार्थ खाल्ला. यानंतर दोघांचीही तब्येत बिघडली आणि उटल्या सुरू झाल्या. अन्य कुटुबीयांना याबाबत कळताच त्यांनी दोघांनाही रुग्णालयात हलवलं. रात्री उपचारादरम्यान प्रीतीचा मृत्यू झाला. तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत. हे ही वाचा- Online गेमसाठी 5 वीतील विद्यार्थ्याची आत्महत्या, आधी आईसमोरच केला सराव औषधाच्या जागी खाल्लं विष.. प्रीतीच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, हा मृत्यू अपघाताने झाला आहे. खोकल्याच्या औषधाऐवजी दोघांनी चुकून विषारी पदार्थ खाल्ला आणि यातच तिचा मृत्यू झाला. सध्या प्रीतीच्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तरी पोलीस या प्रकरणात तपास करीत असून अश्विनची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. त्याच्या जबाबानंतर नेमकी घटना समोर येईल, असंही पोलिसांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या