JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / हुंडाबळीने देश हादरला! लग्नानंतर फ्रिज आणि बाईक दिली नाही, सुनेला जिवंत जाळलं!

हुंडाबळीने देश हादरला! लग्नानंतर फ्रिज आणि बाईक दिली नाही, सुनेला जिवंत जाळलं!

सासरच्या मंडळींनी तिला पेटवून दिलं आणि एका खोलीत बंद केलं. ती ओरडत राहिली पण कोणालाच तिची दया आली नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटना, 31 जानेवारी : कटिहारच्या अमदाबादमध्ये 20 वर्षीय विवाहितासोबत धक्कादायक घटना घडली आहे. 20 वर्षांच्या रेशमी खातून हिला जिवंत जाळण्यात आलं. 15 महिन्यांपूर्वीच तरुणीचं लग्न झालं होतं. पीडितेची आई शमसून निशाने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पीडितेच्या आईने सांगितलं की, फ्रीज आणि बाईकसाठी सासरच्या मंडळींनी मुलीला खोलीत बंद करून तिच्यावर रॉकेल ओतलं आणि जिवंत जाळलं. मुलीने तडफडतच जीव सोडला. महिलेच्या हत्येमागे तिचा पती शेख अहमद सह घरातील सात जणांचा समावेश असल्याचा आरोप मृत महिलेच्या आईने लावला आहे. या घटनेनंतर सासरची मंडळी फरार झाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. हुंड्यासाठी या नराधमांनी लेकीचा जीव घेतल्याचं दु:ख आईला सतत बोचत आहे. मृत महिलेच्या आईने सांगितलं.. रेशमीने आपल्या आईला फोनवर अनेक बाबी सांगितल्याचं समोर आलं आहे. आईने सांगितलं की, रेशमीचं लग्न खूप धुमधडाक्यात झालं होतं. 2020 मध्ये गोंविदपूर गावातील शेख अहमदसोबत तिचं लग्न लावलं होतं. आम्हाला जितकं जमेल तितकं आम्ही लग्नात रेशमीला दिलं होतं. मात्र लग्नाच्या काही दिवसांनंतर सासरची मंडळी फ्रीज आणि पतीसाठी बाईकची मागणी करू लागले. यावरुन रेशमीसोबत मारहाणही केली जात होती. हे ही वाचा- PUBG गेमच्या आड मैत्री, शरीरसंबंध अन् न्यूड व्हिडीओ; Online Game मुळे उद्ध्वस्त हुंड्यासाठी मारहाण.. मुलीसोबत मारहाण करीत असल्याने आम्ही गावात पंचायत देखील बोलावली होती. मात्र सासरची मंडळी ऐकायला तयार नव्हती. शनिवारी रेशमीला मारहाण करण्यात आली. त्यानंतर 1 वाजता तिच्या अंगावर रॉकेल ओतून आग लावली आणि खोलीत बंद केलं. शेजारच्यांनी आम्हाला या घटनेबाबत माहिती दिली. यानंतर आम्ही सासरी पोहोचलो आणि तातडीने तिला रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान रात्री 11 वाजता रेशमीचा मृत्यू झाला. तिला 4 महिन्याचा मुलगाही आहे. धक्कादायक बाब म्हणजे शेख अहमद याने गावाशेजारी एका महिलेसोबत अवैध पद्धतीने निकाह केला होता. आम्हाला कळताच याचा विरोध केला, मात्र तिथे जास्त हुंडा मिळत असल्याचं सांगून या लग्नाला मान्यता दिली, असंही मृत महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितलं. मृत्यूच्या 3 तासांपूर्वी रेशमीने भाजलेल्या अवस्थेत तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. यात तिने अनेकांची नावंही घेतली आहेत.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या