मेरठ 17 ऑगस्ट : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) बागपत जिल्ह्यातील बडगाव (Badagaon) या गावात धार्मिक कारणावरून रविवारी (15 ऑगस्ट 2021) जैन आणि मुस्लीम लोकांच्यात जोरदार संघर्ष झाला. दोन्ही गटांत मारामारी झाल्यानं इथं तणाव निर्माण झाला असून, गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. रविवारी गावातील जैन समाजाच्या (Jain Community) वतीनं त्रिलोक तीर्थ धाम जैन मंदिरात (Trilok Teerth Dham Jain Temple) एका धार्मिक कार्यक्रमाचं (Religious Congregation) आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्त मंदिराबाहेर एका हातगाडीवर ‘शिकंजी’ (Shikanji) (खाद्यपदार्थ) विक्री करण्यात येत होती. या गाडीवर लावण्यात आलेला ‘जैन शिकंजी’चा कागदी बॅनर एका मुलाने अनावधानाने फाडला. तेव्हा त्या गाडीवरील मूळ ‘चिकन बिर्याणी’चे (Chicken Biryani) बॅनर दिसून आले. ही बाब लक्षात येताच जैन समाजातील लोकांनी त्यावर आक्षेप घेतला आणि ही हातगाडी तिथून हटवण्यास सांगितली. Mumbai: EPFO कर्मचाऱ्याने केला 21 कोटींचा घोटाळा,PF कार्यालयातील धक्कादायक स्कॅम ही हातगाडी पूर्वी बिर्याणी विकण्यासाठी वापरली जात होती. ती कार्यक्रमादरम्यान शिकंजी विकण्यासाठी एका मुस्लीम व्यक्तीनं भाड्यानं घेतली होती. शाकाहाराचा पुरस्कार करणाऱ्या जैन लोकांना ही गाडी चिकन बिर्याणीची आहे, हे समजताच धक्का बसला आणि त्यांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला. मात्र यावर त्या मुस्लीम विक्रेत्यानं (Muslim Vendor) आपल्या समाजातील लोकांना बोलावून आणले आणि बसमधून बसून जात असलेल्या जैन समाजाच्या भाविकांवर हल्ला केला, असा आरोप जैन समाजाच्या लोकांनी केला आहे. यावेळी झालेल्या हाणामारीत जैन समाजाच्या दोन जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बदली रद्द करण्यासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी; घरी बोलवून वरिष्ठाचे अश्लील चाळे दरम्यान, बिर्याणीच्या गाडीवर शिकंजी विकून जैन समाजातील भाविकांची फसवणूक करणाऱ्या आणि भाविकांवर हल्ला करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जैन समाजातील सामाजिक कार्यकर्ते ललित जैन यांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी हल्ला करणाऱ्या 70 जणांवर धार्मिक भावना दुखावणे, दंगल करणे आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, सहा जणांची नावे कळली असून अन्य लोक अज्ञात आहेत. त्यापैकी आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य लोकांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गावात शांतता नांदावी यासाठी या भागात पोलीस दल तैनात (PAC) करण्यात आल्याचं खेखारा पोलीस ठाण्याचे प्रमुख एन. एस. सिरोही यांनी सांगितलं.