संपादित छायाचित्र
नवी दिल्ली, 20 जून : ऑनलाइन फूड डिलिव्हरी (Online Food Delivery) ही संकल्पना अलीकडच्या काळात विशेष लोकप्रिय झाली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना घरबसल्या रेस्टॉरंटमधल्या पदार्थांचा आस्वाद घेता येतो. प्रमुख शहरांमध्ये स्विगीसारखे प्लॅटफॉर्म्स ही सुविधा पुरवतात; मात्र, या कंपन्यांच्या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काही अनुचित प्रकार केल्याचं अनेकदा समोर आलं आहे. सध्या सोशल मीडियावर असंच एक प्रकरण विशेष चर्चेत आहे. स्विगी (Swiggy) या ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या एका डिलिव्हरी बॉयने (Delivery Boy) एका महिलेला विचित्र मेसेज (Weird Message) केल्याचं स्पष्ट झालं आहे. संबंधित व्हॉट्सअॅप चॅट (Whatsapp Chat) जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे नेटिझन्सनी स्विगीवर पुन्हा टीकेची झोड उठवली आहे. `दैनिक भास्कर`नं याविषयीचं वृत्त दिलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हॉट्सअॅप चॅट जोरदार व्हायरल होत आहे. त्यात स्विगीच्या एका डिलिव्हरी बॉयनं एका महिलेला `तू खूप सुंदर आहेस`, `मला तुझी नेहमी आठवण येते`, `तुझे डोळे खूप सुंदर आहेत`, अशा प्रकारचे मेसेज पाठवले आहेत. या महिलेने सर्व्हिस प्रोव्हायडरकडे (Service Provider) यासंबंधी तक्रार केली आहे. ट्विटर युझर्सनी या प्रकरणी स्विगीवर टीकेची झोड उठवली असून, महिलेला पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. ‘गुरुवारी @prapthi_M या ट्विटर युजरने ट्विटरवर (Twitter) स्विगीच्या डिलिव्हरी बॉयने पाठवलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट (Screenshot) शेअर केले. प्रत्येक महिलेला अशा प्रकारच्या मेसेजचा सामना करावा लागला असेलच, असं मला वाटतं. मंगळवारी रात्री @swiggyinstamart वरून मला ग्रोसरीची डिलिव्हरी मिळाली. आज मला डिलिव्हरी बॉयने असे विचित्र मेसेज पाठवले आहेत. त्यामुळे मी भयभीत झाले असून हे पहिल्यांदाच घडलेलं नाही,’ असं या महिलेनं स्क्रीनशॉट शेअर करताना लिहिलं आहे. फेसबुकवर मैत्री तोडली म्हणून माथेफिरूनं घरात घुसून केली तरूणीची हत्या, आईलाही केलं जखमी स्विगीच्या डिलिव्हरी बॉयनं या महिलेला `मी तुला खूप मिस करतो`, `तू खूप सुंदर आहेस`, `तुझी वर्तणूक चांगली आहे`, असे मेसेज केले. महिलेनं सर्व्हिस प्रोव्हायडरकडे या डिलिव्हरी बॉयची तक्रार केली; पण स्विगीच्या कस्टमर केअर टीमकडून समाधानकारक प्रतिक्रिया मिळालेली नाही. डिलिव्हरी बॉयकडून या महिलेचा अशा प्रकारे छळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही; पण यावेळी तिनं तक्रार करण्याचा निर्धार केला आणि स्विगी सपोर्टकडे तक्रार नोंदवली. `या घटनेने मला हादरवून सोडलं आहे. आता रात्री उशिरा किंवा एकटी असताना जेवण ऑर्डर करायला मला भीती वाटते,` असं या महिलेनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. या महिलेच्या पोस्टवर अनेक युझर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशी घटना पुन्हा घडू नये, अशी विनंती काही युझर्सनी कमेंट्सच्या माध्यमातून स्विगीला केली आहे. काही युझर्सनी महिलेला होणाऱ्या त्रासाविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला आहे. तथापि, शुक्रवारी शेअर केलेल्या एका अपडेटमध्ये महिलेनं लिहिलं आहे की, स्विगीच्या एस्केलेशन टीमनं आणि त्यांच्या सीईओ कार्यालयानं तिच्याशी संपर्क साधला आहे. पुन्हा असा प्रकार घडू नये, यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील, असं त्यांनी या वेळी सांगितलं आहे, अशी माहिती तिने दिली.