JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / लग्नाचे आमिष देऊन शारिरीक संबंधही ठेवले, पण गर्लफ्रेंड गर्भवती झाली अन्...

लग्नाचे आमिष देऊन शारिरीक संबंधही ठेवले, पण गर्लफ्रेंड गर्भवती झाली अन्...

एका तरुणीसोबत तिच्या प्रियकराने धक्कादायक कृत्य केले.

जाहिरात

तरुणीसोबत घडलं भयानक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सय्यद कयम रजा, प्रतिनिधी पीलीभीत, 29 मे : देशात अनैतिक संबंधातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. तसेच लग्नाचे आमिष देऊन शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याच्याही घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाचे आमिष देत एका तरुणीचे लैंगिक शोषण करून तिची फसवणूक केली. तसेच ती तरुणी गर्भवती झाली होती. मात्र, धोख्याने तिचा गर्भपात केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील पिलीभीतच्या सेहरामऊ उत्तरी पोलीस स्टेशन परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली. तर याबाबत पीडितेने स्थानिक पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. अशा स्थितीत पीडितेने पोलिस अधीक्षकांकडे न्यायाची मागणी केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण - मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने सांगितले की, आपल्या बहिणीचे गावातच लग्न झाले आहे. या कारणामुळे तिला बहिणीच्या घरी ये-जा करावी लागली. यादरम्यान त्याची शेजारी राहणाऱ्या हिमाचल नावाच्या तरुणाशी तिची ओळख झाली. तरुणाने तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि तिला सुंदर स्वप्ने दाखवले. तरुणीने ही माहिती तरुणाचे वडील आणि त्याच्या कुटुंबीयांना दिली. ते एकाच जातीतील आणि नात्यातील असल्याने, मुलगा आणि मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी सहमती दर्शविली. तरुणीला वाटले की, तो तरुणही तिच्याच जातीचा आहे आणि तिच्याशी लग्न करेल. यानंतर दोघेही प्रियकर-प्रेयसी बनले आणि त्यांच्यातील प्रेम आणखी घट्ट होऊ लागले. यानंतर प्रियकर हिमाचलने तरुणीसोबत अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. यामुळे ही तरुणी गर्भवती राहिली. त्यामुळे प्रियकराने तिला गर्भपात करण्यास सांगितले. लग्नाच्या लालसेपोटी तिने गर्भपात करण्यास होकार दिला. त्यानंतर प्रियकराने तिला गावातीलच एका डॉक्टरकडे नेऊन तिचा गर्भपात केला. पण यानंतर तरुणीने तरुणाला लग्नासाठी विचारले असता त्याने नकार दिला. याचा राग मनात धरून तरुणी प्रियकराच्या घरी पोहोचली होती आणि लग्न करण्यावर ठाम राहिली. तरुणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याने पीडितेने पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. मात्र, पोलिसांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. असा आरोप आहे की, संबंधित पोलीस चौकीच्या प्रभारींनी तरुणीचा आणि तिच्या कुटुंबीयांचा चौकीपासून हाकलून लावले. यानंतर पीडितेने जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांकडे दाद मागितली. एसपींच्या आदेशावरून अतिरिक्त एसपींनी गेल्या शनिवारी गावात पोहोचून या प्रकरणाची चौकशी केली आणि सेहरामऊ पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि पीडितेच्या तक्रारीवर प्रियकर तरुण हिमांचल आणि त्याचा मदतनीस सीताराम आणि त्याची पत्नी, हरदवारी लाल, सोवरण लाल, समतलाल आणि देवेंद्र यांच्याविरुद्ध बलात्कारासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या