JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / भयंकर! सपा नेत्यासह पत्नीची क्रूरपणे हत्या; घरातच पुरले मृतदेह

भयंकर! सपा नेत्यासह पत्नीची क्रूरपणे हत्या; घरातच पुरले मृतदेह

त्यांची हत्या केल्यानंतर मृतदेह घरात पुरण्यात आले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बिजनौर, 12 मार्च : बिजनौरमध्ये सपाचे (SP) बिजनेस सेलचे (SP leader) प्रदेश सचिव आणि त्यांच्या पत्नीच्या हत्येचं प्रकरण समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघेही बेपत्ता होते. पोलिसांना त्या दोघांचेही मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यांची हत्या केल्यानंतर मृतदेह घरात पुरण्यात आले होते. ज्या घरात मृतदेह सापडले ते घर सपा नेत्याच्या पत्नीच्या ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलेचे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेनेच मुलाची मदत घेऊन दोघांची हत्या केली. (Brutal murder of wife along with SP leader Bodies buried in the house) अचानक दाम्पत्य झालं होतं बेपत्ता… 28 फेब्रुवारी रोजी राजेश आणि त्यांची पत्नी बबली अचानक बेपत्ता झाले होते. या दाम्पत्याला मूल-बाळ नव्हतं. त्यामुळे कोणीच त्यांची माहिती घेतली नाही.  मात्र आठवड्याभरापासून सतत मोबाइल बंद येत असल्याने राजेशच्या नातेवाईकांना संशय आला. आणि त्यांनी दोघांचा शोध सुरू केला. शुक्रवारी बबलीच्या भावाने काही सपाच्या नेत्यांसह एसपींची भेट घेतली. या महिलेवर व्यक्त केला संशय… पोलिसांनी शुक्रवारी रात्री ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या हमीरपूर गावातील रहिवासी रुमाला गाठलं. संशयावरुन तिच्या मुलालाही ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर दोघांनीही हत्येची कबुली दिली. हमीरपूर येथील त्यांच्या घरात खड्डा खणून मृतदेह पुरले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह जमिनीतूव बाहेर काढला. आई आणि मुलासह अन्य दोन मारेकऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. हे ही वाचा- आमदाराने निवडणुकीसाठी जमलेल्यांना कारने चिरडलं; तब्बल 23 जणं जबर जखमी का केली हत्या? ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या रुमाच्या पतीचे फार पूर्वीच निधन झालं होतं. त्यामुळे रुमाचा घरखर्च पार्लरमधूनच चालत होता. रुमाची नजर या दाम्पत्याच्या मालमत्तेवर होती. या जोडप्याचा खून झाला तर कोणालाही कळणार नाही आणि त्यांचे घर, पार्लर सहज आपल्या ताब्यात येऊल. असा विचार करून दोघांनी दाम्पत्याची हत्या केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या