पीलीभीत, 8 ऑगस्ट : पुढच्या आठवड्यात रक्षाबंधन आहे. मात्र, त्याआधीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या पीलीभीत येथून ही बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये रक्षाबंधनापूर्वी भावाने बहिणीची हत्या केली आहे. काय आहे संपूर्ण बातमी - सोमवारी सकाळी मुलीचा मृतदेह घराच्या फासावर लटकलेल्या अवस्थेत आईला आढळून आला. याप्रकरणी आईने मुलावर खुनाचा आरोप केला. यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. ही घटना देवरियाच्या भागातील पाकिया गावातील आहे. याठिकाणी एक 28 वर्षीय तरुणी तिच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळली. मृतदेह पाहल्यावर घरात एकच गोंधळ उडाला होता. तर या घटनेनंतर मृताची आई विमला देवी यांनी आरोप केला की, गावकऱ्यांनी मुलाकडे तक्रार केली होती की त्यांची बहीण गच्चीवर फिरत असे. ती तरुण झाली आहे, आता तिच्याशी लग्न करु टाका, असेही गावकऱ्यांनी त्याच्याकडे सांगितले होते. याचा राग आल्याने अनिलने रविवारी सायंकाळी उशिरा बहिणीला घरात बेदम मारहाण केली आणि बहिणीला पोलिसांत तक्रार करता येऊ नये म्हणून म्हणून रात्रीच तिला फासावर लटकवत तिची हत्या केली. सोमवारी सकाळी जेव्हा आईला जाग आली तेव्हा तिला मुलीचा मृतदेह घरात फासावर लटकलेला दिसला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. हेही वाचा - तु नवऱ्याची झाली नाहीस तर माझी काय होणार, ऐकल्यावर 4 वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलेल्या प्रेयसीचं भयानक कृत्य घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर मृत तरुणीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला ताब्यात घेतले. तर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.