JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई, IPL सामन्यावर कोट्यवधीचा सट्टा लावणारा दगडा अखेर अटकेत

औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई, IPL सामन्यावर कोट्यवधीचा सट्टा लावणारा दगडा अखेर अटकेत

औरंगाबाद जिल्ह्यात अत्यंत छुप्या पद्धतीने अनेक ठिकाणी आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावण्यासाठी दगडाचे एजंट कार्यरत होते.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सचिन जिरे, प्रतिनिधी औरंगाबाद, 04 नोव्हेंबर :   सध्या आयपीएलचा (IPL)धुमधाम सुरू असून याच सामन्यावर विविध ठिकाणी एजंट नेमून कोट्यवधींचा सट्टा चालविणाऱ्या सट्टा किंग म्हणून जिल्ह्यात परिचित असलेल्या मनोज दगडाला (Manoj Dagada) औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने (Aurangabad Police) बेड्या ठोकल्या आहेत. आज दुपारी त्याला न्यायालयासमोर हजार करण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अत्यंत छुप्या पद्धतीने अनेक ठिकाणी आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावण्यासाठी दगडाचे एजंट कार्यरत होते. जिन्सी पोलिसांनी गेल्या महिन्यात अशाच एका एजंटला अटक केली होती. त्या नंतर दगडाचे नाव समोर आले होते. तर काची वाड्यातून पिता-पुत्रांना अटक केली होती. तर दोन आठवड्यांपूर्वीच सिटीचौक पोलिसांनी रोजेबाग परिसरात एका फ्लॅटमध्ये छापा मारून आयपीएल सामन्यावर सट्टा लावण्यासाठी सुरू असलेला कॉल सेंटरवर छापा मारला होता. भरवस्तीत दिवाळीआधी फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 3 जणांचा होरपळून मृत्यू विशेष म्हणजे, या ठिकाणी महिला शिक्षिकेला कामावर ठेवण्यात आले होते. त्यानंतर 21 ऑक्टोबर रोजी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. तेंव्हापासून गुन्हे शाखेचे पथक दगडाची चौकशी करीत होते. चौकशी दरम्यान  पोलिसांना चकमा देण्यासाठी दगडाने वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आणि सिमकार्ड हे बनावट कागदपत्रे आधारे घेतल्याचे समोर आले आहे.  त्या क्रमांकावरून सट्टा घेतला जात असल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी आज दगडाला अटक केली अशी माहिती सूत्रांनी दिली. हा सर्व प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता तर कोट्यवधी रुपयाची उलाढाल आयपीएल सामन्यावर होत होती. यामध्ये पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी हवाला रॅकेटचा देखील उपयोग करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. ‘सेक्सही जीवनाचा अधिकार’, लेस्बियन जोडप्याच्या लिव्ह-इन प्रकरणात HCचा निकाल आज आरोपी दगडाला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, सन 2015 मध्ये देखील शहरातील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात दगडा विरोधात सट्टा प्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यानंतर पहिल्यांदाच ही दगडावरची  मोठी कारवाई समजली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या