कोटा, 3 सप्टेंबर : राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या मैत्रिणीवर तिने विश्वास ठेवला होता, तिच्यामुळे मुलीवर हे संकट कोसळलं. हे प्रकरण इतक्यावरच थांबलं नाही, तर याचा व्हिडीओ शूट करण्यात आला आणि व्हायरल करण्याची धमकी देऊन लोकांकडे पाठवत राहिली. मुलगी या सर्व जाळ्यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत होती. एकेदिवशी कशीबशी ती पोलीस ठाण्यात पोहोचली आणि त्यांना तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. मुलीची आर्थिक स्थिती हलाखीची… मुलीच्या कुटुंबाची पार्श्वभूमीदेखील हैराण करणारी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या मुलीसोबत हा प्रकार घडला तिचं वय 15 वर्षे आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. आणि यानंतर आई मनोरूग्ण झाली होती. तिचा भाऊ आधीच मानसिक रूग्ण आहे. ज्यामुळे कुटुंबाची जबाबदारी तिच्या खांद्यावर आली. नोकरीसाठी तिने आपल्या मैत्रिणीशी संपर्क केला. तिचं वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे. या मैत्रिणीने आपल्या प्रियकरासोबत मिळून मुलीला कॉल गर्ल बनवलं. नऊ वर्षाच्या विद्यार्थ्याला कपडे काढून मारहाण, जळगावमधील खासगी क्लासच्या शिक्षिकेचा धक्कादायक प्रताप दारू प्यायला दिली आणि केला बलात्कार… आरोप आहे की, रोहित नावाच्या एका तरुणाकडे तिला पाठवण्यात आलं होतं. काम देण्याच्या आमिषाने मुलगीही तिथं गेली. रोहितने एका हॉटेलात नेत तिच्यावर बलात्कार केला. आणि दारू पाजली. यानंतर त्याने आपल्या मित्रांना बोलावलं आणि अनेक दिवसांपर्यंत मुलीला डांबून ठेवलं. तिच्यावर वारंवार बलात्कार केला जात होता. मुलगी कशी-बशी यातून सुटली. सर्वात आधी पोलिसात जाऊन तिने घडलेला प्रकार सांगितला. तिच्या मैत्रिणीसह रोहित, सूर्यकुमारसह अनेकांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेतला जात आहे.