JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / सचिनने केले क्लीन बोल्ड, पण बॅट्समनला आला राग, घडलं भयानक कांड

सचिनने केले क्लीन बोल्ड, पण बॅट्समनला आला राग, घडलं भयानक कांड

एका बॅट्समनने क्लीन बोल्ड झाल्यानंतर धक्कादायक कृत्य केले.

जाहिरात

धक्कादायक घटना

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अखंड प्रताप सिंह, प्रतिनिधी कानपूर, 21 जून : भारतात क्रिकेट या खेळाचे अनेकांना वेड आहे. मात्र, हाच क्रिकेट खेळ खेळत असताना एका मुलाची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. क्रिकेट मॅच दरम्यान मुलाने बॅट्समनला क्लीन बोल्ड केले. त्यामुळे बॅट्समनला इतका राग आला की, त्याने बॉलरचा गळा दाबून खून केला. काय आहे संपूर्ण प्रकरण - उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. सचिन नावाच्या मुलाने गोलंदाजी करत हरगोविंदला क्लीन बोल्ड केले. हरगोविंद क्लीन बोल्ड झाल्यावर हरगोविंद आनंदोत्सव साजरा करू लागला. मात्र, क्लीन बोल्ड झाल्यानंतर हरगोविंद इतका संतापला की त्याने सचिनला मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. तसेच तो शवविच्छेदनासाठी पाठवला. ही धक्कादायक घटना कानपुरच्या घाटमपुरच्या रेवन्ना येथील आहे. इथे डेरा राठी खलासा गावात दरी के गावातील मुले क्रिकेट मॅच खेळत होते. दरम्यान, हरगोविंद नावाचा मुलगा फलंदाजी करत होता आणि सचिन गोलंदाजी करत होता. वेगवान गोलंदाजी करताना सचिनने हरगोविंदला क्लीन बोल्ड केले आणि सेलिब्रेशन सुरू केले. त्याचवेळी क्लीन बोल्ड झाल्यावर हरगोविंदला इतका राग आला की त्याने सचिनला मारहाण करून त्याचा गळा दाबून खून केला. यानतंर सचिन बेशुद्ध असल्याचे पाहून हरगोविंदने तेथून पळ काढला. दरम्यान, सोबतच्या मुलांनी गावकऱ्यांना माहिती दिली, त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सचिनचा मृतदेह ताब्यात घेतला, तर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एसीपी दिनेश कुमार शुक्ला यांनी सांगितले की, क्रिकेट सामन्यादरम्यान सचिन आणि हरगोविंद ब्रजेश यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. यामध्ये हरगोविंद आणि ब्रिजेश यांनी आधी सचिनवर प्राणघातक हल्ला केला आणि नंतर त्याची गळा आवळून हत्या केली. सचिनचे वय अंदाजे 15 वर्षे असून, त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या शोधासाठी 3 पथके तयार करण्यात आली आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या