JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / Ayodhya Ram Mandir : अयोध्येतलं राम मंदिर अल कायदाच्या हिट लिस्टवर? 'मस्जीद वही बनायेंगे' म्हणत धमकी

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतलं राम मंदिर अल कायदाच्या हिट लिस्टवर? 'मस्जीद वही बनायेंगे' म्हणत धमकी

आंतरराष्ट्रीय जिहादी गटानं राम मंदिर पाडून त्या जागी मशीद बांधण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 06 जानेवारी : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतलं राम मंदिर दर्शनासाठी खुलं केलं जाईल, अशी ही घोषणा आहे. या पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटना सक्रिय झाल्याचं चित्र आहे. आंतरराष्ट्रीय जिहादी गटानं राम मंदिर पाडून त्या जागी मशीद बांधण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.

गझवा-ए-हिंद या नियतकालिकाच्या ताज्या अंकात याबाबत माहिती प्रकाशित झाली आहे. याशिवाय जिहादी फीडच्या वतीने या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या ऑनलाइन मासिकामध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. भारतीय मुस्लिमांनी जिहादला पाठिंबा द्यावा, असं आवाहनही करण्यात आलं आहे. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे ही वाचा :  जैन समाजाच्या रोषानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अखेर सम्मेद शिखर…

संबंधित बातम्या

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, 110 पानांच्या संपादकीय लेखामध्ये म्हटलं आहे की, ‘बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर बांधलं जात आहे. ते लवकरच पाडलं जाईल आणि मूर्तींऐवजी अल्लाहची बाबरी मशीद बांधली जाईल. यासाठी त्यागाची गरज आहे.’ तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, संपादकीय लेखातला मजकूर भारतीय वातावरणाशी परिचित असलेल्या व्यक्तीनं लिहिलेला वाटतो.

जाहिरात

मुस्लिमांनी भीती बाळगू नये - अल कायदा

अल कायदानं भारतीय मुस्लिमांना उद्देशून म्हटलं आहे, की त्यांनी भौतिक नुकसानाला घाबरू नये. कारण त्यांनी आधीच अनेक दशकांपासून जीवित आणि वित्त हानीचं नुकसान सोसलेलं आहे. हे मनुष्यबळ आणि संपत्ती जिहादसाठी वापरली असती तर एवढी हानी झाली नसती. भारतातली धर्मनिरपेक्षता ही भारतीय मुस्लिमांसाठी ‘नरक’ आहे, असं दहशतवादी संघटनेनं म्हटलं आहे. हिंदू-मुस्लिम बंधुत्वाच्या घोषणा ही निव्वळ फसवणूक असल्याचंही या लेखात म्हटलं आहे.

जाहिरात

या लेखात सांगण्यात आलं आहे की, ‘ही सर्व फक्त माहिती नाही. बाबरी मशीद 30 वर्षांपूर्वी पाडण्यात आली होती. 20 वर्षांपूर्वी गुजरातमध्ये अहमदाबादेत गर्भवती महिलांना जाळण्यात आलं. आज सर्वत्र बुलडोझर चालवले जात आहेत. जामिया मिलिया (इस्लामिया), अलीगढ, जामिया उस्मानिया (हैदराबाद उपनगर) आणि देवबंदमधल्या (शहर) प्रत्येक मुस्लिमाविरुद्ध हिंदू आपले चाकू, भाले आणि तलवारी धारदार करत आहेत.

जाहिरात

हिंदूंना लाठ्या वापरायला शिकवलं जात आहे - अल कायदा

अल कायदानं म्हटलं आहे, की ‘सर्व हिंदूंना लाठी वापरण्यास शिकवलं जात आहे. भाजी कापण्यासाठी वापरल्या जाणार्‍या चाकूनं मुस्लिमांचे चेहरे आणि डोकं कापण्याच्या गोष्टी हिंदू महिलांच्या तोंडातून बाहेर पडत आहेत. संपूर्ण भारतीय उपखंड इस्लामचा भाग व्हावा आणि मूर्तीपूजा बंद व्हावी, यासाठी अल-कायदाचा जिहाद लढण्याचा मानस आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या