JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / औरंगाबाद पुन्हा हादरलं! डॉक्टरच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला, सुरा पोटात खुपसला

औरंगाबाद पुन्हा हादरलं! डॉक्टरच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला, सुरा पोटात खुपसला

औरंगाबाद शहरातील (Aurangabad News) कर्करोग रुग्णालयातील डॉक्टरवर एका रुग्णाच्या नातेवाईकांनी प्राणघातल हल्ला (Crime News) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 8 डिसेंबर : औरंगाबाद शहरातील (Aurangabad News) कर्करोग रुग्णालयातील डॉक्टरवर एका रुग्णाच्या नातेवाईकांनी प्राणघातल हल्ला (Crime News) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कॅनॉट प्लेस भागातील एका अपार्टमेंटमध्ये मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय कर्करोग रुग्णालयातील डॉक्टर अब्दुल राफे हे कॅनॉट भागातील एका अपार्टमेंटमध्ये राहतात. ते मंगळवारी रात्री रुग्णालयातून घरी आले. यावेळी एक व्यक्ती पोट दुखण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरी आली. डॉक्टरांकडून चिठ्ठीवर औषधं लिहून घेतली. यानंतर ती व्यक्ती औषधं दाखविण्यासाठी डॉक्टरांच्या घरात आला. यावेळी डॉक्टर त्याला औषधं कशी घ्यायची याबद्दल सांगत असताना त्याने त्यांच्या पोटात चाकू खुपसला. हे ही वाचा- पुतण्याने काकाचा दिला भयावह अंत; हत्येनंतरही घरात राहिला बसून माझ्या बहिणीला मारलं..म्हणून केला हल्ला.. चाकू हल्ला झाल्यानंतर डॉक्टरांच्या पोटातून खूप रक्त वाहू लागलं होतं. हल्लेखोर पळून जात असताना नागरिकांनी त्याला पकडलं. यावेळी त्याने माझ्या बहिणीला मारलं असं म्हणत तेथून पळ काढला. मात्र या आरोपीची दुचाकी अपार्टमेंटच्या खालीच राहिली. या घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत डॉ. राफे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही दुचाकी कर्नाटकातील गुलबर्गा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या