रायगड, 5 फेब्रुवारी: छत्तीसगडच्या (Chhattisgarh News) रायगडमध्ये अल्पवयीन बहिणींनी आपल्या आत्याची हत्या केली. आत्या मुलींना मोबाइल (Mobile Use) वापरावरुन वारंवार बोलत असे, यामुळे रागाच्या भरात या बहिणींनी आत्याचीच हत्या (Killed Atya) केली. दररोजचा ओरडा आणि सतत अडवणूक करीत असल्यामुळे त्यांनी आत्याच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. पोलीस दोन्ही अल्पलयीन मुलींची चौकशी करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 फेब्रुवारी रोजी चक्रधर नगर पोलिसांना एका तरुणीची हत्या करण्यात आल्याचं वृत्त मिळालं. पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर कळालं की तरुणीचं नाव तुलसी भाठ असून ती 35 वर्षांची होती. अद्याप तिचं लग्न झालं नव्हतं. यामुळे ती भावाच्यात घरात राहत होती. पोलिसांनी सांगितलं की, तुलसीला दोन भाच्या आहेत. एकीचं वय 17 तर दुसरी 15 वर्षांची आहे. मोठी भाची आता शाळेत जात नाही. तिने दहावीनंतर शिक्षण सोडलं. तर छोटी भाची 10 वीत शिकते. यावरुन दोन्ही बहिणी संतापल्या… या दोघी अल्पवयीन मुली तुलसीचा मोबाइल घेऊन मित्रांसोबत फोनवर बोलत असे यावर आत्या तुलसी त्यांना ओरडत असे. ती त्यांना वारंवार सांगायची की, मोबाइलचा फार वापर करू नका, आणि मित्रांसोबत फार बोलायचं नाही. मात्र आरोपी मुली आत्याच ऐकत नव्हत्या. 3 फेब्रुवारी रोजी छोटी भाची आत्याचा फोन घेऊन तिला न सांगता शाळेत निघून गेली. शाळेतून आल्यानंतर तिने मोठ्या बहिणीला बोलावलं आणि तलावावर अंघोळीला निघून गेली. पोलिसांनुसार, येथेच दोघींनी आत्याला मारण्याचा प्लान केला. हे ही वाचा- बीड हादरलं! ‘माझ्या मुलाला मोबाइल का विकला’ म्हणत 14 वर्षीय मुलाचा घेतला जीव अशी केली हत्या.. मुलींनी पोलिसांना सांगितलं की, 3 फेब्रुवारीच्या रात्री छोटी भाची तुलसीचा मोबाइल घेऊन अभ्यास करीत होती. तुलसीने हे पाहून गोंधळ घातला. ती भाचीवर चिडली. नकार दिल्यानंतरही तू का फोन घेतला, असं म्हणून तिला ओरडू लागली. तिने भाचीच्या कानशिलात दिली. या सर्व प्रकारानंतर सर्वजण जेवण करून झोपले. छोटी भाची रात्री 12 वाजता उठली. ती साधारण रात्री 2 वाजता तुलसीच्या खोलीत गेली. तुलसी झोपेत असल्याचं दिसताच बाहेरून कुऱ्हाड घेऊन आली व तुलसीच्या अंगावर वार करू लागली. तुलसीचा आवाज ऐकून मोठी भाचीही उठली. तिला पाहून छोटीने पुन्हा तुलसीवर वार केले. तुलसीचा जागेवरच मृत्यू झाला.